शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गंगाबाई रुग्णालयातील समस्यांचे निराकरण करा

By admin | Updated: May 6, 2016 01:32 IST

येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो महिला रुग्ण उपचारासाठी येत असून दररोज अनेको रुग्णांना याठिकाणी भर्ती करण्यात येते.

गोंदिया : येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो महिला रुग्ण उपचारासाठी येत असून दररोज अनेको रुग्णांना याठिकाणी भर्ती करण्यात येते. अशात रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षा रक्षक, वीज त्याच बरोबर स्वच्छतेसह अनेक आवश्यक गरजांची पुर्तता करणे हे रुग्णालय प्रशासनाचे कर्तव्य असून रुग्णालयातील समस्येचे निराकरण तातडीने करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान केली. बुधवारी पटले यांनी बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान, त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील स्वच्छतेच्या समस्येबाबतीत चर्चा करून रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवावा व सफाई यंत्रणा पूर्ववत करावी. तसेच सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करून रुग्णालयातील कुचकामी ठरत असलेली सुरक्षा यंत्रणेला कामावर लावण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातुन त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते यांना वैद्यकीय अधीक्षक यांच्या दालनात बोलावून तत्काळ निर्णय घेऊन रुग्णांच्या समस्या सोडविण्यास सांगितले. तसेच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरूस्त करण्याची मागणी केली. याचप्रमाणे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना देखील बोलावून रुग्णालयाच्या परिसरात कुठल्याही प्रकारचा कचरा न ठेवता परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगितले. दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धकाते व वैद्यकीय अधीक्षक डॉ. दोडके यांनी सर्व समस्यांचे निराकरण तत्काळ करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी भरत क्षत्रिय, दीपक कदम, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला, पंकज रहांगडाले, सुनील केलनका, शिवगोपाल बडगुजर, संजय मुरकुटे, ऋषिकांत साहू, कमलेश सोनवाने, अजय लौंगाणी, मुकेश हलमारे, कुशल अग्रवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)