शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्व घटकांच्या सहकार्याने वाटचाल करण्याचा संकल्प

By admin | Updated: June 11, 2016 01:54 IST

गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पक्ष्याचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस : १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरागोंदिया : गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पक्ष्याचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा ध्वज फडकविण्यात आला.१७ वर्षामध्ये या पक्षाने आपली कार्यकक्षा फार मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सजग राहून येणाऱ्या नगर परिषदेच्या व सहकार विभागाच्या निवडणुकांमध्ये उत्तम रितीने प्रदर्शन घडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत, असे विचार आमदार जैन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विनोद हरिणखेडे होते.जिल्हा मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जि.प.चे पक्ष नेते गंगाधर परशुरामकर, महिला राकाँपाच्या अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, विद्यार्थी राकाँपाचे अध्यक्ष केतन तुरकर, भंडारा जिल्हा अर्बनचे अध्यक्ष महेश जैन, शहर अध्यक्ष शिव शर्मा, नगरसेविका सुशिला भालेराव, मनोहर वालदे, जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी आ.जैन म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस सदैव आपले नेते शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकास कामात अग्रसर असतो. येत्या काळात नगर परिषद व सहकार क्षेत्राच्या निवडणुका येत असून कार्यकर्त्यांनी सजग राहून पक्षाला विजयी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागून पक्षाची ध्येयधोरणे व विकासात्मक बाबी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.कार्यक्रमाला रमेश गौतम, बाळकृष्ण पटले, मनोज डोंगरे, जितेश टेंभरे, राजकुमार एन जैन, प्रेम रहांगडाले, नरेंद्र (नरू) हालानी, शैलेष वासनिक, विनायक खैरे, आदि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन जिल्हा प्रवक्ता रवी मुंदडा यांनी तर आभार प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी मानले. (जिलहा प्रतिनिधी)