शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

परिषदेचे ठराव फक्त कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:13 IST

न्यायालयाच्या परवानगी नंतर नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा २७ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. पाच विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेत पाच मिनिटांतच निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देन्यायालय निर्णयाच्या अधीन : प्रकरणावर आज सुनावणी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : न्यायालयाच्या परवानगी नंतर नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा २७ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. पाच विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेत पाच मिनिटांतच निर्णय घेण्यात आला. मात्र सभेतील निर्णय हे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार असल्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे सभेतील हे पाचही ठराव फक्त कागदोपत्रीच राहणार आहेत. सोमवारी (दि.१३) न्यायालयात सुनावणी असल्याने आता पुढे काय होते हे बघायचे आहे.नगर परिषद उपाध्यक्षांच्या निवडीला घेऊन विरोधी पक्षातील सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रकरण न्यायालयात असल्यामुळे नगर परिषदेच्या सभांवर स्थगिती आली आहे. परिणामी नगर परिषदेच्या नवीन कार्यकाळात फक्त एकच सभा झाली आहे. त्यानंतर सभा घेण्यात आल्या नाहीत. अशात न्यायालयाच्या आदेशावरून २७ आॅक्टोबर रोजी नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. शहराशी निगडीत पाच महत्वपूर्ण विषयांवर नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी ही सभा बोलविली. महत्वाचे विषय असल्याने उपस्थित सदस्यांनी आपली सहमती दर्शविली व फक्त पाच मिनिटांतच ही सभा आटोपली होती.सभेत पाच विषयांवर एकमताने निर्णय घेण्यात आला. मात्र पाचही ठराव फक्त कागदोपत्रीच राहणार ही बाब येथे महत्वाची आहे. कारण सभेत घेण्यात येणारे निर्णय न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार असल्याचे न्यायालयाने पूर्वीच स्पष्ट करून सभेची परवानगी दिली असल्याची माहिती आहे. अशात निर्णय घेऊनही काहीच फायदा होणार नाही असे दिसून येते. अर्थात घेण्यात आलेली सभा सध्या तरी काहीच फायद्याची ठरणार नाही असे बोलले जात आहे.सोमवारी (दि.१३) प्रकरणी न्यायालयात सुनावणी असल्याने आता या सुनावणीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या सुनावणीत निर्णय लागल्यास त्यानंतरच पालिकेवरील निर्बंध उठणार व सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांवर अंमलबजावणी करता येणार आहे. शिवाय अंतिम निर्णय न झाल्यास सभेतील निर्णय तसेच कागदोपत्री राहणार आहेत.या पाच विषयांवर होती सभाआरोग्य विभागातंर्गत सन २०१७-१८ या वर्षाकरिता किटकनाशक फवारणी करिता कमी दर मंजूरी, नगर परिषद क्षेत्रात भकट्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, नगर परिषद क्षेत्रात बेवारस डुकरांचा बंदोबस्त, बांधकाम विभागांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी तसेच नगर रचना विभागांतर्गत नगर परिषदेच्या मालकीची जागा भुखंड क्रमांक ३०-३ व १२३ मधील क्षेत्र पोलीस स्टेशन रामनगर व कर्मचारी वसाहतीकरिता हस्तांतरित करणे या विषयांवर सभा बोलाविण्यात आली होती.