शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

११५ जणांचा नेत्रदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:13 IST

विदर्भ सिंधी विकास परिषद, श्री सख्खर पंचायत व झुलेलाल अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड ज्योती अभियानांतर्गत नेत्र तपासणी शिबिर, स्वयंप्रेरणेने नेत्रदानाचा संकल्प व शपथ ग्रहण कार्यक्रम पार पडला.

ठळक मुद्देअखंड ज्योती अभियान : ४५० रूग्णांची नेत्र तपासणी व साहित्य वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भ सिंधी विकास परिषद, श्री सख्खर पंचायत व झुलेलाल अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड ज्योती अभियानांतर्गत नेत्र तपासणी शिबिर, स्वयंप्रेरणेने नेत्रदानाचा संकल्प व शपथ ग्रहण कार्यक्रम पार पडला. यात ११५ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला.अध्यक्षस्थानी लक्ष्मीचंद रोचवानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून खा. मधुकर कुकडे, माजी आ. राजेंद्र जैन, डॉ. अजित सिन्हा, डॉ. अरूण दुधानी, डॉ. अपर्णा गुप्ता, साजनदास वाधवानी, महेश लालवानी, माधवदास खटवानी, भाविका बघेले, इंद्रकुमार होतचंदानी, मुकेश भागवानी, धनराज आहुजा, लक्ष्मण लधानी, मनोज दुल्हानी, डॉ. दिलीप करंजेकर, डॉ. आमकर, डॉ. बोपचे व समाजबांधव उपस्थित होते.या वेळी रोचवानी यांनी भविष्यात सदर संस्थेमार्फत कॅन्सर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी सर्व सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. केटीएस रूग्णालयाच्या नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले यांनी नेत्रदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली.तर माजी आ. राजेंद्र जैन यांनी, यापूर्वी सदर संस्थेद्वारे घेण्यात आलेले थॅलेसिमिया शिबिर, रक्तदान शिबिर, महिलांना रूबेला टीकाकरण, वाहन चालक परवाना शिबिर, आयएएस मार्गदर्शन शिबिरांबद्दल आभार मानले. तसेच लवकरच गोंदिया शहरात सुपर स्पेशालिटी कॅन्सर निर्मूलन हॉस्पिटल सुरू होणार असल्याची माहिती देवून सिंधी समाजात कार्य करणाऱ्या ‘बढते कदम’ संस्थेची प्रशंसा केली.खा. कुकडे यांनी, सिंधी समाज नेहमीच समाज सेवेच्या कार्यात अग्रेसर असतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपूर्ण सुविधा उपलब्ध करू व समाजाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. अखंड ज्योती अभियानांतर्गत एकूण ४५० लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर एकाच दिवशी जिल्ह्यात प्रथमच ११५ जणांनी नेत्र दानाचा संकल्प करून शपथ घेतली.या वेळी उपस्थित मान्यवर व डॉक्टर यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. संचालन हरिशकुमार खत्री यांनी केले. आभार डॉ. हरिश बजाज यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीचंद तेजवानी, प्रेम तिर्थानी, संतोष होतचंदानी, सुखदेव रामानी, मुकेश पंजवानी, मनीषरॉय मुक्ता, जगदीश पृथ्यानी, सुशांत वासनिक, मुलचंद नेचवानी, रजनी होतचंदानी, वैशाली नूनानी, सीमा दिवानी, रीमा बजाज, सीमा सुखराणी, प्रियंका नेचवानी, नीलम चिमलानी, सीता शिवदासानी, भारती चांदवानी, कविता खत्री, तारासिंग रामानी, राकेश होतचंदानी, ओम थंदानी, दीपक कुंदनानी, प्रदीप डोडवानी, अनिल वलेचा व समाजाच्या संस्थांनी सहकार्य केले.