शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

टेकाबेदरवासीयांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

लोहारा : देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंडकेपार-गोटाबोडी अंतर्गत मौजा टेकाबेदर येथे मागील २ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण ...

लोहारा : देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या पिंडकेपार-गोटाबोडी अंतर्गत मौजा टेकाबेदर येथे मागील २ वर्षांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सन १९७९ मध्ये गावात प्रथम बोअरवेल खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या बोअरवेलला भरपूर पाणी लागले होते. नंतर काही काळात ४ बोअरवेल खोदून हातपंप बसविण्यात आले. असे एकूण ५ बोअरवेल खोदण्यात आले. पंरतु यापैकी ३ बाेअरवेल निकामी आहेत. एकाला खूपच कमी पाणी असल्याने ग्रामस्थानां भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सन १९९८-९९ या कालावधीत गावात नळयोजना अंमलात आली. तेव्हा गावातील प्रथम बोअरवेलने पाण्याचा पुरवठा पाणी टाकीत करून गावात नियमित पाणी पुरविले जात होते. त्या सर्व बोअरवेलची खोली २०० फूट आहे. सन १९८१ ते २०१९ पर्यंत गावाला एकाच बोअरवेलने पाणी पुरविले गेले. या काळात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासली नाही. परंतु सन २०१९ पासून गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा होणाऱ्या बोअरवेलजवळ गावातील एकाने स्वतःच्या मालकीची ३५० फूट खोल बोअरवेल खोदली आहे. तेव्हापासून पाणी टाकीला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बोअरवेलला पाणी कमी झाल्याने संपूर्ण टेकाबेदर गावाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईची तक्रार घेऊन गावकऱ्यांनी प्रथमत: पिंडकेपार येथील गट ग्रामपंचायतकडे धाव घेतली. परंतु ग्रामपंचायतने समस्येकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून गट विकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले. यावर तहसीलदारांनी पाणीपुरवठा विभागाचे संदीप पवार यांना मौका चौकशी करण्यास सांगितले. संदीप पवार यांनी टेकाबेदर गावाला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्यांनी पाणी टाकी लगत ४०-५० फूट अंतरावर असलेल्या त्या शेतकऱ्याचा पंप बंद करायला सांगितले. पण त्यांनी तो पंप बंद केला नाही. या विषयासंदर्भात उपविभागीय अभियंता, उपविभागीय वीज कार्यालयालाही गावकऱ्यांनी निवेदन दिले. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने पाणी टचांईचा प्रश्न सुटला नाही.

....................

काही लोकांमुळे गावकऱ्यांना त्रास

निसर्गाने नाही तर गावातील १-२ लोकांनी संपूर्ण गावाला संकटात टाकले असून आजघडीला पाण्याच्या शोधात गावकरी १-२ किलोमीटर अंतरावरून शेतातल्या बोअरवेलचे पाणी पिण्याकरिता आणतात. पण ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची सुद्धा जाणीव गावकऱ्यांना नाही. अशात पाणी संकटांचा सामना गावकरी भर पावसाळ्यातही करीत आहेत. योग्य ती चौकशी करून पाणी टंचाईची समस्या सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी अनेकदा स्थानिक ग्रामपंचायतसह तालुका व जिल्हा प्रशासनाकडे केली. पंरतु प्रशासन व लोकप्रतिनीधींच्या सततच्या वेळकाढू धोरणामुळे हा प्रश्न सुटला नाही. आता सोमवारी (दि.२६) गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.