शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

आयएसओ दर्जासाठी निवासी शाळेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:28 IST

मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळा नुकतीच १६ दिवस विद्युत पुरवठा खंडीत असल्याच्या मुद्दावरुन चर्चेत आली होती.

ठळक मुद्देप्राथमिक सुविधांचा अभाव : समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळा नुकतीच १६ दिवस विद्युत पुरवठा खंडीत असल्याच्या मुद्दावरुन चर्चेत आली होती. या दरम्यान येथील सोयी सुविधांचा भोंगळ कारभार पुढे आला होता. याच शाळेची आता आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी धडपड सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.दुर्गम आदिवासी भागातील गरीब अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निवासी राहून दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी मुर्री येथे या विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून शासकीय निवासी शाळा व वसतिगृह सुरू करण्यात आले. सध्या येथे इयत्ता पाचवी ते दहावीचे १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, दोन वेळेचे जेवण, नाश्ता तसेच इतर सुविधा समाज कल्याण विभागातंर्गत पुरविल्या जातात. यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान देखील या शाळेला दिले जाते. मात्र यानंतरही येथे सोयी सुविधांचा अभाव आहे. या शाळेच्या इमारतीच्या खिडक्यांचे काचे फुटली आहे, तसेच सुरक्षित वीज पुरवठ्याचा अभाव, एकाही खिडक्यांना पडदे नाहीत, खोल्यांमधील पंखे केवळ नावापूरतेच आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जा देखील चांगला नसल्याची ओरड येथील विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांनी एखाद्या गोष्टीची तक्रार केल्यास त्या तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी वसतिगृहाच्या अधिकाºयांना त्यांनाच दमदाटी केली जात असल्याचे काही विद्यार्थ्यांनी नाव लिहिण्याच्या अटीवर सांगितले. एकंदरीत येथे विविध सोयी सुविधांचा अभाव असताना आता समाज कल्याण विभागाने या शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी धडपड सुरू केली आहे. ही निवासी शाळा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्यातील असल्याने काहीही झाले तरी शाळेला आयएसओ दर्जा मिळालाच पाहिजे अशी भूमिका समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांनी घेतल्याची माहिती आहे.अधिकाºयांची शाळेकडे पाठमुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळा व वसतिगृहाचा विद्युत पुरवठा तब्बल १६ दिवस खंडित होता. विद्यार्थी अंधारात झोपत होते. मात्र याची जबाबदारी असलेल्या समाज कल्याण विभागाने या शाळेला भेट देणे टाळले होते. लोकमतने यासंबंधीचे वृत्त प्रकाशीत केल्यानंतर अधिकाºयांनी वसतिगृहाकडे धाव घेतली होती. नियमानुसार शासकीय निवासी शाळा व वसतिगृहाना अधिकाºयांनी भेटी देणे अनिवार्य आहे. मात्र यानंतरही अधिकारी याकडे दुर्लक्ष करित असल्याचे चित्र आहे.