शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ‘जलाशये’ अजूनही तहानलेलीच

By admin | Updated: July 30, 2016 00:12 IST

जिल्ह्यात अजूनही धो-धो बरसणाऱ्या पावसाने हजेरी लावलेली नाही. कधी रिमझिम तर कधी एखादा ठोक अशा प्रमाणात...

धो-धो पावसाची गरज : अर्ध्या पावसाळ्यानंतरही मध्यम प्रकल्पात ठणठणाट गोंदिया : जिल्ह्यात अजूनही धो-धो बरसणाऱ्या पावसाने हजेरी लावलेली नाही. कधी रिमझिम तर कधी एखादा ठोक अशा प्रमाणात हजेरी लावणाऱ्या पावसामुळे पाणी जमिनीत मुरत असले तरी मध्यम आणि मोठ्या जलाशयांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. अर्धा पावसाळा संपला असला तरी या जलाशयांमध्ये ५० टक्केही पाणीसाठा नाही. यातच खरीप हंगामात वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पावसाची स्थिती चांगली राहील, असा अंदाज होता. मात्र हा अंदाज फोल ठरत आहे. बांध्यात रोवणीयोग्य पाणी साचत नसल्यामुळे शेतकऱ्यांना धानाची रोवणी कशी करावी असा प्रश्न पडला आहे. सध्या जिल्ह्यातील इटियाडोह धरण २९.८५ टक्के, शिरपूर जलाशय ३०.८४ टक्के, पुजारीटोला धरण ४०.५९ टक्के, कालीसराड ३६.४२ टक्के तचर मध्यप्रदेशातील संजय सरोवर ६४.६५ टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली. सध्या संजय सरोवराचे दोन गेट ०.२१ मीटरपर्यंत उघडून ७०.७९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (प्रतिनिधी) मध्यम प्रकल्पातही जेमतेम साठा जिल्ह्यातील काही मध्यम प्रकल्पातही पाण्याचा ठणठणाठ दिसून येत आहे. बोदलकसा जलाशयात जलसाठा ७.४१ दलघमी असून त्याची टक्केवारी ४५.०३ आहे. चोरखमारा जलाशयात जलसाठा ३.४० दलघमी (१६.३६ टक्के) आहे. चुलबंद जलाशयात जलसाठा १.८९ दलघमी (१०.५४ टक्के) आहे. मानागड प्रकल्पात ०.६१ दलघमी (८.६१ टक्के) आहे. रेंगेपार प्रकल्पात ०.९३ दलघमी (२६.२० टक्के) आहे. संग्रामपूर २.३४ दलघमी (६०.५० टक्के) आहे. कटंगी ६.६४ दलघमी (७०.६६ टक्के) आहे. कलपाथरी २.२७ दलघमी (३४.४२ टक्के), उमरझरी १.६७ दलघमी (३०.३० टक्के) व खळबंदा प्रकल्पात २.७३ दलघमी (१७.०९ टक्के) जलसाठा आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. जून महिन्यात दगा देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात बऱ्यापैकी हजेरी लावली. संपूर्ण महिनाभर नियमितपणे पावसाचे हजेरी लावणे सुरू आहे. मात्र येणारा पाऊस रिमझिम स्वरूपाचा जास्त असतो. अधूनमधून एखादा ठोक येतो पण ते पाणी काही वेळातच जमिनीत मुरून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानपिकासाठी रोवणीयोग्य पाणी बांधीत जमा होत नाही. यामुळे पूर्णपणे वरथेंबी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे गणित बिघडत आहे. रोवणीसाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत.