शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती विभागाला द्यावे लागणार वेळोवेळी रिपोर्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 22:33 IST

मागील काळातील काही कटू अनुभव पाहता यंदाच्या पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मिनिट टू मिनिट रिपोर्टिंग पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मंत्रालयास करावे लागणार आहे.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन विभागांना नियंत्रण कक्ष सहसचिवांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काळातील काही कटू अनुभव पाहता यंदाच्या पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मिनिट टू मिनिट रिपोर्टिंग पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मंत्रालयास करावे लागणार आहे.जिल्ह्यात घडलेल्या आपत्तीच्या घटनांची माहिती मंत्रालयात सुरु करण्यात आलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वेळेत दिली जात नसल्याने राज्यासह केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागास त्याचे अहवाल वेळेत देता येत नाही. परिणामी त्यातून मिळणारी सर्वप्रकारची मदतही अपेक्षित वेळेत मिळत नसल्याची तीव्र नाराजी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाच्या प्रमुखांनी व्यक्त केली.तर यंदा पावसाळ्यासह संपूर्ण वर्षभरात कुठेही केव्हाही कुठलीही आपत्तीची घटना घडल्यास त्याची माहिती त्वरीत मंत्रालयातील नियंत्रण कक्षास देण्याचे आदेशही त्यांनी सर्वच जिल्ह्यातील विभागांना दिले आहेत. कक्षांतर्गत जिल्ह्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय विभागांसह बड्या खासगी आस्थापनाही जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अथवा इतर कालावधीत कुठलीही आपत्ती घडल्यास त्याची त्वरीत माहिती या कक्षास मिळते. त्यांच्याकडून लागलीच आवश्यक ती उपाययोजना अन मदतही केली जाते. परंतु राज्यस्तरीय किंवा केंद्रीय मदतीसाठी ही माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षास देणे आवश्यक आहे. पण ती दिलीच जात नाही. या कक्षाला वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या किंवा सोशल मिडियावरुन याची माहिती मिळते. त्यातून शासनाला द्यावा लागणारा अहवालही विलंबाने सादर केला जातो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह वेळेत अहवाल सादर करता येत नाही. त्यामुळे आता प्रत्येक घटनेची माहिती देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. यातून काही जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी बाहेर पडले आहेत. त्यांना पुन्हा यात समाविष्ट करुन घेतले जाईल. त्यांनी पुन्हा बाहेर पडू नये, असेही आदेश राज्य नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे यांनी दिले आहेत.