शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोराची बिनधास्त तक्रार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी, यासाठी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता अभियान राबविले जात आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या सोयीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे १०६५ हे टोल फ्री क्रमांक आहे. यावरूनही नागरिकांना आपली तक्रार नोंदविता येते. शिवाय, विभागाच्या कार्यालयात जाऊनही तक्रार नोंदविता येते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षापासून अवघ्या जगाला कोरोनाने हेलावून सोडले आहे. यामध्ये आतापर्यंत लाखो लोकांचा जीव गेला असून त्यापेक्षा कठीण बाब म्हणजे, लाखो लोकांच्या हातचा रोजगार हिरावला असून त्यांना दिवस काढणे कठीण झाले आहे. मात्र अशा या कठीण समयीही लाचखोरी काही संपलेली नाही. काम करून देण्यासाठी आताही लाचखोर समोरील माणसाची परिस्थिती जाणून न घेता थेट पैसे घेत आहेत. लाचखोरीचा हा प्रकार संपला पाहिजे व लोकांमध्ये असलेली भीती निघावी, यासाठीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता अभियान राबविले जात आहे. यातून नागरिकांनी न घाबरता अशा लाचखोरांची तक्रार करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. 

१०६५ टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार

- नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी, यासाठी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता अभियान राबविले जात आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या सोयीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे १०६५ हे टोल फ्री क्रमांक आहे. यावरूनही नागरिकांना आपली तक्रार नोंदविता येते. शिवाय, विभागाच्या कार्यालयात जाऊनही तक्रार नोंदविता येते. 

कोणत्याही व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्या. यासाठी कार्यालयात येऊन किंवा १०६५ टोल फ्री क्रमांकाचा वापर करता येईल. तसेच संबंधित व्यक्तीचे काम करून दिले जाणार, यामुळे घाबरण्याची गरज नाही.- पुरुषोत्तम अहिरकरपोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.

अडलेले काम पूर्ण होणारच- काम करून देण्यासाठी पैसे मागणे यालाच लाचखोरी म्हटले जाते. मात्र, लाच मागणाऱ्या त्या व्यक्तीची तक्रार केल्यास पुढे आपले काम होणार नाही, अशी भीती नागरिकांच्या मनात असते. यातूनच ते चुपचाप पैसे देऊन टाकतात. मात्र, लाच देणे सुद्धा गु्न्हा आहे. यामुळे कोणीही लाचेची मागणी केल्यास थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करा. यानंतर विभागाकडून तक्रारदाराचे काम करवून दिले जाणार. यामुळे कुणालाही लाचखोरांना घाबरण्याची गरज नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहिरकर यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण