दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : ‘गाव करी ते राव न करी’ अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय पवनतलावच्या आवारात गेल्यावर निदर्शनास येतो. येथील युवकांनी आदर्शाचे पाठ गिरवित नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष लक्ष्मीकांत बारेवार यांच्या पुढाकाराने पवनतलावचा चेहरा-मोहराच बदलवून टाकला आहे. त्यामुळे पवन तलावच्या सौंदर्यीकरणात अधिकची भर पडली आहे.आशिष बारेवार यांनी श्रमदानातून कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून येथील युवकांना पवनतलावच्या सौंदर्यीकरणासाठी प्रेरित केले. या युवकांवी गाळलेल्या घामाची फलश्रृती अशी की पवनतलावचे नंदनवन झाले. गेल्या ४५ आठवड्यांपासून युवकांनी येथे श्रमदान केले. झाडावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली. चिमुकल्यांना झुले, घसरणपट्टी, व्यायाम खांब लावले आहेत. वृद्धांसाठी सिमेंटच्या खुर्च्या व कुटी तयार केल्या. आजघडीला या ठिकाणी येणाºया-जाणाºया नागरिकांची संख्या वाढत असल्याचे सुखद चित्र आहे. हिरव्या वृक्षांनी बहरलेल्या परिसरात तरूण व्यायामाच्या दृष्टिकोनातून तर वृद्ध फिरण्यासाठी सकाळ-सायंकाळ येथे असून तासनतास घालवित आहेत.स्वच्छता अभियानापासून सुरु झालेल्या या उपक्रमाला युवकांनी उदंड प्रतिसाद दिला.यासाठी नमन जैन, विलास बारेवार, यश कुंडलवार, दीपक रहांगडाले, अमोल भेंडारकर, संजय घासले, हिमांशू बारेवार यांच्यासह इतर युवकांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या गाळलेल्या घामाचे फलित येथे येणाºयांच्या आनंदातून व्यक्त होते.पवनतलावचे खोलीकरणतलावातील पाणी साठवण क्षमता वाढावी म्हणून तलावातील गाळही काढण्यात आला आहे. त्यामुळे पवन तलावची पाणी साठवण क्षमता वाढली असून येणाºया काळात तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचे बारेवार यांनी सांगितले.सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूरपवनतलावच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने १५ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती आहे. काही महिन्यांनंतर सौंदर्यीकरणाचे काम सुरु होईल. येथील एका कंत्राटदाराला हे काम मंजूर झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे येणाºया काळात पवनतलावला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त होऊ शकतो यात शंका नाही.
पवनतलावच्या सौंदर्यीकरणात पुन्हा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:19 IST
‘गाव करी ते राव न करी’ अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय पवनतलावच्या आवारात गेल्यावर निदर्शनास येतो. येथील युवकांनी आदर्शाचे पाठ गिरवित नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष लक्ष्मीकांत बारेवार यांच्या पुढाकाराने ....
पवनतलावच्या सौंदर्यीकरणात पुन्हा भर
ठळक मुद्देपक्ष्यांसाठी पाण्याची सोय : चिमुकल्यांसाठी लागली खेळणी