शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विरोधी काळे कायदे रद्द करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST

सालेकसा : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन व ...

सालेकसा : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कृषी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन व उपोषण करण्यात आले.

केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमेवर १०० दिवसांपेक्षा जास्त दिवसापासून आंदोलनाला बसले आहेत. या कालावधीत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले. मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेचा देखावा केला आहे पण हे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. तीन काळे कायदे शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारे आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्याला मिळणारा हमीभाव, शेतकरी हक्काच्या बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार, व्यापारी व उद्योजकांना शेतकऱ्यांची लूट करण्याची मुभा मिळणार आहे. म्हणूनच देशातील शेतकरी या विरोधात पेटून उठले आहेत. त्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले. गेल्या सहा वर्षांपासून अव्वाच्या सव्वा कर जनतेची लूट केंद्र सरकार करीत आहे. या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कांबळे यांना देण्यात आले.

शिष्टमंडळात जिल्हा महिला काँग्रेस प्रतिनिधी वंदना काळे, जिल्हा सचिव राजू काळे, तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव चूटे, माजी जि.प. सभापती लता दोनोडे, मनोज गजभिये, नितेश शिवणकर,डॉ. संजय देशमुख, नरेशकावरे, देवराज खोटेले, जितेंद्र बल्हारे, ओमप्रकाश लिल्हारे यांचा समावेश होता.