शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रावणवाडी-कामठा-आमगाव रस्त्याचा जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:22 IST

विधानसभा क्षेत्रातील ग्राम रावणवाडी- बिरसी विमानतळ- कामठा- पांजरा- कट्टीपार- आमगाव रस्त्याचा लवकरच जिर्णोद्धार होणार आहे. या २९ किमी रस्त्याच्या रूंदीकरण व पुनर्निमाणासाठी शासनाने हाईब्रिडी एन्युटी योजनेंतर्गत ११६ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्देपुढील १० वर्षांपर्यंत देखभाल-दुरूस्ती : ११६ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा क्षेत्रातील ग्राम रावणवाडी- बिरसी विमानतळ- कामठा- पांजरा- कट्टीपार- आमगाव रस्त्याचा लवकरच जिर्णोद्धार होणार आहे. या २९ किमी रस्त्याच्या रूंदीकरण व पुनर्निमाणासाठी शासनाने हाईब्रिडी एन्युटी योजनेंतर्गत ११६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, पुढील १० वर्षांची देखभाल-दुरूस्तीही यात समाविष्ट आहे.चांगले रस्ते असलेल्या क्षेत्रातच उद्योगरूपी समृद्धी येते असा आमदार गोपालदास अग्रवाल यांचा विश्वास असून ते क्षेत्रातील रस्त्यांचे जाळे अधीक मजबूत व्हावे यासाठी प्रयत्नरत असतात. यातूनच रावणवाडी -कामठा मार्गावर रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचा कालवा त्यांच्या प्रयत्नातून निर्माणाधिन आहे. मध्यंतरी राज्य शासनाच्या ३०५४ विशेष दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत ११५ लाख रूपयांचा निधी नागरा-नवेगाव; गिरोला-बेलटोला; लोहारा-रतनारा; दासगाव-रायपुर-निलागोंदी; पिंडकेपार शिव मंदिर- बाजपेई वॉर्ड- मुर्री; कोरणी-कारूटोला व फुलचूर-फुलचूरटोला रस्त्यांसाठी मंजूर करविला.आदिवासी विभागाकडून १५० लाख रूपयांचा निधी पांगडी-खर्रा; गोंडीटोला-आसोली; हासिंगटोला-निलागोंदी; हलबीटोला-मोहरानटोली; गोंडीटोला-गिरोला; हाबूटोला-बिरसी; सितुटोला-मानूटोला; बेलटोला-गिरोला; बेलटोला-निलज व मंगरूटोला-लंबाटोला रस्त्यांसाठी मंजूर करविला. याशिवाय ग्राम विकास विभागाकडून ४८२ लाख रूपये, नोव्हेंबर महिन्यात १०३६ रूपयांचा निधी तर मुख्यमंत्री रस्ते योजनेतून १७.५० कोटींचा निधी मंजूर करविला असून यांतर्गत रस्त्यांचे काम सुरू आहे. याशिवाय गरज होती त्या ठिकाणी पुलांचेही काम केले जात आहे.अशातच रावणवाडी-कामठा-आमगाव या २९ किमी रस्त्यासाठी तसेच या रस्त्याच्या पुढील १० वर्षांच्या देखभाल- दुरूस्तीसाठी शासनाने ११६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाक डून निविदा प्रक्रीया सुरू असून हे झाल्यावर रस्त्याचे काम सुरू होणार आहे.पुलासाठी ८५ लाखांचा निधीही मंजूरविशेष म्हणजे, याच मार्गावर असलेल्या ग्राम खातीया जवळील बाघ प्रकल्पाच्या कालव्यावर पुलाच्या बांधकामासाठी ८५ लाख रूपयांचा निधी राज्य शासनाने अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. या दोन्ही कामांसाठी आमदार अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पाठपुरावा करून प्रस्ताव शिफासरसह शासनाला सादर करविला होता. तसेच मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करून दोन्ही कामांना मंजूरी मिळविली.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल