शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काढला ३.९ लाख घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 21:49 IST

सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे पीक अडचणीत येऊ नये यासाठी शासनाने माजी मालगुजारी तलावांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम आखला. सन १७-१८ या वर्षात ३७९ तलावांमधून गाळ काढायचा होता. यातील ९४ तलावांतील संपूर्ण गाळ काढण्यात आला असून १२० तलावांमधील तलावात गाळ काढण्याचे काम अजून सुरु आहे.

ठळक मुद्देमालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन : ९४ मामा तलावांची कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सिंचनाअभावी शेतकऱ्यांचे पीक अडचणीत येऊ नये यासाठी शासनाने माजी मालगुजारी तलावांचा पुनरुज्जीवन कार्यक्रम आखला. सन १७-१८ या वर्षात ३७९ तलावांमधून गाळ काढायचा होता. यातील ९४ तलावांतील संपूर्ण गाळ काढण्यात आला असून १२० तलावांमधील तलावात गाळ काढण्याचे काम अजून सुरु आहे. ३१ जानेवारीपर्यंत ३ लाख ९ हजार ७०६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गोंदिया तालुक्यातील १८ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून २१ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ६८ हजार ५४७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. गोरेगाव तालुक्यातील १८ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आले असून १८ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ७६ हजार ५१० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तिरोडा तालुक्यातील १७ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १८ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात २८ हजार ४६४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील १० तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून ११ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात १९ हजार ५५७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.देवरी तालुक्यातील १५ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १५ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात १९ हजार ११ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील १२ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १३ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ५८ हजार १४९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सालेकसा तालुक्यातील ४ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १० तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात ११ हजार ९१९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एकही तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला नाही. १४ तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या तालुक्यात २७ हजार ५४९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. अशाप्रकारे, जिल्ह्यातील ९४ तलावांतील गाळ पूर्णत: काढण्यात आला असून १२० तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ७०६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.३८७ तलाव करतात शेतकऱ्यांना समृद्धशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून माजी मालगुजारी तलावांचा पुनरज्जीवन कार्यक्रम सुरु केला. त्यात सन २०१६-१७ या वर्षात ३८७ तलावामधील ८ लाख ११ हजार ३० घनमीटर गाळ काढून शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी हे तलाव सज्ज झाले आहेत.