शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काम न करताच १.६६ लाख काढले

By admin | Updated: May 21, 2017 01:41 IST

जिल्हा परिषदेच्या यांत्रीकी विभागात कार्यरत मानकर यांनी नळ योजनेच्या देखभाल दुरूस्तीच्या नावावर

देखभाल दुरूस्तीचा ७ गावात्ांील प्रकार : उपअभियंता मानकर यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा परिषदेच्या यांत्रीकी विभागात कार्यरत मानकर यांनी नळ योजनेच्या देखभाल दुरूस्तीच्या नावावर कंत्राटदारांशी संगणमत करून सात गावातील एक लाख ६६ हजार ५३२ रूपयाचे बोगस बिल लावून पैश्याची उचल करण्यात आल्याची तक्रार मुख्यमंत्र्याच्या नावे आपले सरकार या अ‍ॅपवर करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या यांत्रीकी विभागात कार्यरत असलेले उपअभियंता मानकर यांनी केलेल्या बोगस बिल प्रकरणाची तक्रार गोंदिया तालुक्याच्या इर्री येथील भाऊलाल तरोणे यांनी केली आहे. ग्राम पंचायत सातगाव व तेढा येथे सन २०१५ या वर्षी विद्युतपंप काढून हातपंप बसविण्यात आले. सद्यास्थितीत हातपंपाचे पाणी वापरणे सुरू आहे. तरी देखील या ठिकाणचे विद्युत पंप दुरूस्तीचे देयके सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात दोन वेळा काढण्यात आले आहेत. सन २०१६-१७ या वर्षाचे सातगावचे २३ हजार ९८० रूपये तर तेढाचे २५ हजार ९३ रूपये काढण्यात आले आहेत. गांधीटोला, तिरखेडी, दरबडा, साखरीटोला व बोटे या गावात योजना सुरळीत सुरू आहे. कोणताही बिघाड नाही. तरी देखील २०१६-१७ या वर्षात देखभाल दुरूस्ती व टी.एस.पी. या योजनेतून देयके काढण्यात आली आहेत. गांधीटोला या गावातून २३ हजार ९८० रूपये, दरबडा येथील २४ हजार २७८ रूपये, साखरीटोला येथील २३ हजार ५६८ रूपये, तिरखेडी येथील २४ हजार १२७ रूपयाचे बोगस बिल काढण्यात आले आहेत. आमगाव तालुक्याच्या बोदा गावात कोणतीही लघु नळ पाणी पुरवठा योजना सुरू नाही. तरीही या गावचे विद्युतपंप देयके सन २०१६-१७ मध्ये काढण्यात आले. २२ हजार ९६ रूपयाचे बूल काढण्यात आले आहेत. उपअभियंता मानकर यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार खा. नाना पटोले यांनीही विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाऊलाल तरोणे यांनी केली आहे.