शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या उपसरपंचाला पदावरून दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुरमाडी येथील उपसरपंचांनी पदाचा दुरुपयोग करून शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुरमाडी येथील उपसरपंचांनी पदाचा दुरुपयोग करून शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी तक्रार नरेश धनराज ठवकर यांनी उपायुक्तांकडे केली होती. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही यासंदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाकडूनच उपसरपंंचांना अभय दिले जात असल्याचा आरोप ठवकर यांनी केला आहे.

याविषयी प्राप्त माहितीनुसार मुरमाडी येथील उपसरपंचांना सन २०१७-१८मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले आहे. सन २०१७पासून ते उपसरपंच पदावर कार्यरत असतानाही शासकीय योजनेचा लाभ त्यांनी घेतला. हा पदाचा दुरुपयोग असून, त्यांना त्वरित पदावरुन दूर करण्यात यावे, या संदर्भातील तक्रार ठवकर यांनी तिरोडा पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडेही केली होती. परंतु, त्यांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याने ठवकर यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (विकास) यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दि. ८ डिसेंबर २०२०ला पत्र देऊन याप्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, याप्रकरणी अद्याप कुठलीही चौकशी करून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ठवकर यांनी पुन्हा याविषयी विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.