राजकुमार बडोले : मुंडीपार येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे भूमिपूजनगोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था आहे. त्यामुळे अनेक गावात वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. विद्यार्थी, शेतकरी व कामानिमित्त बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांना त्यामुळे अडचणी होत आहे. हे चित्र बदलविण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह अन्य रस्त्यांच्या योजनेतून अधिकाधिक चांगले रस्ते तयार करुन तालुक्याचा रस्त्यांचा अनुषेश दूर करु, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार ते मोहगाव या साडेचार कि.मी. रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन शनिवारी (दि.२२) पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने मुंडीपार येथे आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, जिल्हा परिषद सदस्य विश्वजीत डोंगरे, तालुका भाजपा अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, पंचायत समिती सदस्य अलका काठेवार, सरपंच सिंधू मोटघरे व रंगारी यांची मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना बडोले यांनी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळपास ११ कोटींची कामे या तालुक्यात करण्यात येत आहे. तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढले असून कलपाथरी व कटंगी प्रकल्पातून पाणी मिळाल्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. जिल्ह्यात या वर्षात ऊर्जा विकासाकरीता १२४ कोटी रु पये मंजूर झाले आहे. त्यामुळे वीजेच्या समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. मोहाडी येथे नव्याने ३३ के.व्ही. उपकेंद्र मंजूर झाले असून लवकरच या उपकेंद्राचे काम सुरु होईल. मोहाडी परिसरातील गावांना योग्य प्रमाणात वीज पुरवठा होण्यास त्यामुळे मदत होईल. आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे धान खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पटले यांनी, जिल्ह्यातील शेतकरी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यात येतील. बेरोजगार व भूमीहिनांना रोजगार उपलब्ध करु न देण्यासाठी प्रयत्नशील असून लोकांच्या विकासासाठी शासन किटबध्द असल्याचे सांगितले. प्रास्ताविक मांडून आभार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता नंदनवार यांनी मानले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, पोलीस निरिक्षक सुरेश कदम, सहायक गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील यांची तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)तहसील व पं.स. कार्यालयासाठी प्रयत्नकार्यक्रमाता बोलताना पालकमंत्री बडोले यांनी, यंत्रणांनी कामे करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून काम करावे असे सांगत रोजगार हमी योजनेतून तलावांच्या खोलीकरणाची व मजगीची कामे वाढविली पाहिजे असे सांगीतले. तसेच कलपाथरी प्रकल्पात ५० एकर जमीन ज्या शेतकऱ्यांची जात आहे त्यांना अनुदान देण्याचे नियोजन करावयाचे सांगत गोरेगाव येथे तहसील व पंचायत समितीसाठी नविन इमारतीची आवश्यकता असून यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यांचा अनुशेष दूर करु
By admin | Updated: April 25, 2017 00:48 IST