शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

दोन कंपन्यांकडून प्राप्त होणार रेमडेसिविर इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय कोट्याशिवाय शहरातील विविध खासगी रुग्णालयांना जिथे कोविड रुग्णांवर उपचार केला जात आहे. त्यांनासुध्दा रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. खासगी रुग्णालयाला सनफार्मा कंपनीकडून १५० आणि जुबीलेंड कंपकडून ३०० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनमुळे जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या दोन्ही कंपनीच्या संचालकांशी खा. प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली.

ठळक मुद्देदिलासादायक बाब : शासकीय कोट्यात देखील केली वाढ : प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली होती. मात्र यासाठी शासकीय कोटा निश्चित करण्यात आला आहे. हा कोटा वाढवूृन जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व पालकमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्ह्याचा कोटा वाढवून देण्यात आला.गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय कोट्याशिवाय शहरातील विविध खासगी रुग्णालयांना जिथे कोविड रुग्णांवर उपचार केला जात आहे. त्यांनासुध्दा रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. खासगी रुग्णालयाला सनफार्मा कंपनीकडून १५० आणि जुबीलेंड कंपकडून ३०० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनमुळे जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या दोन्ही कंपनीच्या संचालकांशी खा. प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांनी ४५० इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे हे इंजेक्शन गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय कोट्याव्यतिरिक्त प्राप्त होणार आहे. जिल्ह्याच्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या कोट्यात सातत्याने वाढ करण्यासंदर्भात पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशी चर्चा केली. बुधवारीसुध्दा जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या माध्यमातून रेमडेसिविर इंजेक्शनसंदर्भात ऑर्डर काढण्यात आल्याची माहिती आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्याला १२०० आणि भंडारा जिल्ह्याला १००० रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले आहे. यापुढे या दोन्ही जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा कोटा वाढविण्यासाठी ते प्रयत्नरत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस