शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकासाठी पाणी सोडा

By admin | Updated: August 26, 2016 01:31 IST

स्थानिक परिसरासह जवळच्या खेड्यापाड्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतात धान पिक रोवणी केली आहे,

शेतकऱ्यांची आर्त हाक : जमिनीला पडल्या भेगाबाराभाटी : स्थानिक परिसरासह जवळच्या खेड्यापाड्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतात धान पिक रोवणी केली आहे, पण या ग्रामीण भागात मात्र पाऊस कमी पडला आहे. पाण्याविना शेती कशी पिकेल असा प्रश्न उद्धभवत आहे, म्हणून शेतकरी वर्ग धरणातून पाणी द्या अशी आर्त हाक मारत आहेत.अर्जुनी मोरगाव या संपूर्ण तालुक्यात जवळपास पंधरा दिवसापासून पाऊस नाही. परिसरात खासगी पाण्याच्या साधनांची टंचाई आहे. साधने प्रत्येक शेतकऱ्याकडे नाहीत. शेतजमीनीवर पीक आहे. त्यामुळे रोवलेल्या जमिनीला पाणी नसल्याने भेगा पडलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी नसेल तर शेती पिकणार कशी? अशी चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. पाण्याचा जिल्हा असूनही पाणी मिळत नाही. तालुक्यात इटियाडोह, गोठणगाव धरण व नवेगावबांध हे दोन जलसाठा असणारे पाण्याचे स्त्रोत आहे. सदर जमिनीला पाणी मिळावे म्हणून सभा, उपोषणे झाले पण पाणी काही मिळेना. शेतात पाणी पडावा म्हणून पाट तयार झाले, पण पाणी यायला मार्ग नाही. निसर्गाच्या पाण्याने तर यंदा शेतकऱ्यांवर तलवार टांगली पण जलसाठ्याचे तरी पाणी द्या अशी मागणी येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, ब्राम्हणटोला,पिंपळगावमध्ये होत आहे.