शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

रेल्वे स्थानकावर विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण

By admin | Updated: May 3, 2017 00:55 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे स्थानकांवर प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा प्रदान करण्यासाठी कार्य केले जात आहे.

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे स्थानकांवर प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा प्रदान करण्यासाठी कार्य केले जात आहे. सोमवार (दि.१) गोंदिया रेल्वे स्थानकावर विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. गोंदिया स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर नवनिर्मित फूट ओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्म क्रमांक १ तसेच ३ व ४ वर नवनिर्मित लिफ्टचे उद्घाटन भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याप्रसंगी खा. नाना पटोले यांनी महाराष्ट्र एक्सप्रेसला प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून नियमित प्रस्थानाचा शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून केला. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सुविधा झाली आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस प्लॅटफॉर्म-१ वरून सोडण्यात यावी, ही गोंदियावासियांची अनेक दिवसांपासूनची मागणी आता पूर्ण झाली आहे. याशिवाय दिव्यांगांना रेल्वे सवलत मिळवून घेण्यासाठी येणाऱ्या समस्या लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरद्वारे १ व २ मे २०१७ रोजी गोंदिया स्थानकावर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत दिव्यांगांसाठी विशेष शिबिराचा शुभारंभ खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी दिव्यांगांनी आपल्यासोबत फोटोे, ओळखपत्र, अ‍ॅड्रेस प्रूफ, जन्म प्रमाणपत्र व चिकित्सेसंबंधी दस्तावेज आदी कागदपत्रे सोबत आणावे व शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार गोपालदास अग्रवाल, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी अर्जुन सिब्बल, मंडळातील इतर अधिकारी ए.के. सूर्यवंशी, वाय.एस. बाकडे, रमन मेठी, हरिंद्र मेठी, इतर लोकप्रतिनिधी व जनसमुदाय उपस्थित होते.(प्रतिनिधी)