शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव व तिरोडा रूग्णालयांचा कायाकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:53 IST

रूग्णालयांचा कायाकल्प करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून ‘कायाकल्प’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देशनिवारी चमूने केली पाहणी : आरोग्य सेवा व भौतिक सुविधांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रूग्णालयांचा कायाकल्प करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून ‘कायाकल्प’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांची पीर असेसमेंट करण्यासाठी जिल्ह्यातील तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालय व आमगाव येथील ग्रामीण रूग्णालयाची निवड करण्यात आली. या दोन्ही रूग्णालयांची पाहणी गडचिरोली येथील चमूने शनिवारी केली.रूग्णालयातील बाह्यरूग्ण सेवा, आंतररूग्ण सेवा, प्रसूती, एक्सरे, तांबीचे प्रमाण, औषध पुरवठा, आकस्मीक आरोग्य सेवा, संदर्भ सेवा अशा विविध सेवा कशा पद्धतीने दिल्या जातात. तसेच आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपलब्ध असलेली साधने, रूग्णालयाचे स्वरूप, रूग्णालयात करण्यात आलेल्या भौतिक सुविधा या सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याची चमू जिल्ह्यात आली होती. तिरोडा येथे एक तर दुसरी चमू आमगाव येथे पाहणी करण्यासाठी आली होती.शासनाच्या दिलेल्या निकषानुसार हे दोन रूग्णालय किती टक्के खरे उतरले याची पाहणी यावेळी करण्यात आली. सदर चमूने रूग्णालय परिसरात असलेल्या सर्वबाबींची काटेकोरपणे पाहणी केली. आमगाव येथे दाखल झालेल्या चमूत डॉ. चौधरी, डॉ. पंकज पटले, प्रविण यांचा समावेश होता. यावेळी आमगाव रूग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. शोभना सिंह यांनी त्यांच्या येण्यापूर्वी रूग्णालयात किती रूग्णांना उपचार दिला गेला होता. झालेल्या प्रसूती व इतर सेवा तर त्यांनी या दिड वर्षात आमगाव ग्रामीण रूग्णालयाच्या बदलेल्या रूपाची माहिती दिली. यावेळी आमगाव तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व परिचर उपस्थित होते.