शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खंडित बिलाची तक्रार खारिज

By admin | Updated: June 10, 2015 00:48 IST

विद्युत कंपनीने वीज पुरवठा खंडित करून त्या कालावधीचे बेकायदेशीर बिल शेतकऱ्याला पाठविले.

न्यायमंच : सुधारित बिल भरल्याने वीज पुरवठा सुरूगोंदिया : विद्युत कंपनीने वीज पुरवठा खंडित करून त्या कालावधीचे बेकायदेशीर बिल शेतकऱ्याला पाठविले. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई एक लाख रूपये मिळावी म्हणून त्याने न्यायमंचात तक्रार दाखल केली. परंतु वीज कंपनीचे सुधारित बिल दोन हजार ४०० रूपये सदर शेतकऱ्याने भरले व कंपनीने वीज पुरवठा पुर्ववत सुरू केला. त्यामुळे शेतकऱ्याची सदर तक्रार न्यायमंचाने खारित केली. केशवराव दाजीबा पाथोडे रा. दत्तोरा (ता.जि. गोंदिया) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या पाच एकर शेतील पाईपलाईनद्वारे पाणी पुरविण्यासाठी सन २००५ मध्ये विद्युत पुरवठा घेतला होता. सदर विद्युत पंप वाघ इटियाडोह डाव्या कालव्यावर बसविला होता. नियमित वीज बिल भरणे सुरू असतानाच अचानक डिसेंबर २०१० मध्ये वीज मीटर जळाले. त्यांनी वारंवार मीटर बदलविण्याचा अर्ज केला. मात्र त्यांना डिसेंबर २०१० चा एक हजार ८० रूपये व जून २०११ मध्ये दोन हजार २० रूपये असा एकूण तीन हजार १०० रूपये बिल आला. तसेच कुठलीही सूचना न देता जानेवारी २०१२ मध्ये कंपनीने पुरवठा बंद केल्याने त्यांचे रबी पिकाचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. शिवाय मार्च २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीचे बेकायदेशीर बिल रद्द करावे. पुरवठा खंडित झाल्यामुळे मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई एक लाख १५ हजार रूपये मिळावी म्हणून त्यांनी न्यायमंचात तक्रार दाखल केली. विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात, मीटर हे बॅकींश स्थितीमध्ये असल्याने रिडिंग घेणे शक्य नव्हते. शिवाय पुरवठा सुरू असल्याने सरासरी बिल देण्यात आले. परंतु ग्राहकाने थकीत बिलाचा भरणा न केल्याने आॅक्टोबर २०१२ मध्ये तात्पुरता पुरवठा खंडित करण्यात आला. तसेच लोकशाही दिनी केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारकर्ता व सहायक अभियंता यांच्यात आपसी समझोता झाला. त्यात तक्रारकर्त्याने सुधारित बिल दोन हजार ४०० रूपये व पुनर्जोडणीचे १०० रूपये भरावे असे ठरले. शेतकऱ्याने सदर रक्कम भरल्यावर वीज पुरवठा २७ जानेवारी २०१४ रोजी पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे नमूद केले.यावर न्यायमंचाने कारणमिमांसा केली. यात वीज कंपनीने पाथोडे यांना बिल दुरूस्त करून सुधारित बिल दिले. त्याचा भरणा करण्यात आला. त्यामुळे वीज कंपनीच्या सेवेतील त्रुटी सिद्ध होत नाही. शिवाय शेतीला झालेल्या नुकसानीचा कुठलाही पुरावा पाथोडे यांनी प्रकरणात सादर केला नाही. त्यामुळे शेतकरी पाथोडे यांची तक्रार न्यायमंचाने खारिज केली. (प्रतिनिधी)