शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित श्रीरामनगरचा तिढा कायम

By admin | Updated: June 19, 2015 01:27 IST

तालुक्यातील मौजा कालीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी या गावांचे पुनर्वसन सौंदडजवळील श्रीरामनगर येथे सन २०१२-१३ ला करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट : तहसीलमध्ये घेतली बैठकसडक अर्जुनी : तालुक्यातील मौजा कालीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी या गावांचे पुनर्वसन सौंदडजवळील श्रीरामनगर येथे सन २०१२-१३ ला करण्यात आले. पुनर्वसनाचा परिपूर्ण फायदा आम्हाला मिळाला नाही म्हणून पुनर्वसनग्रस्त आपल्या स्वगावी परतले. त्यांनी दिलेल्या निवेदनाचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दखल घेवून गुरूवारी (दि. १८ जून) तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत पुनर्वसनाच्या समस्यांचा तिढा कायमच राहीला.प्राप्त माहितीनुसार, मौजा कवलेवाडा, कालीमाती, झनकारगोंदी या जंगलव्याप्त गावांचे पुनर्वसन श्रीरामनगर येथे करण्यात आले असून शासनाकडून आम्हाला आश्वासनानुसार पूर्णवणे लाभ मिळाला नसून आमच्या काही समस्या आहेत त्या समस्या सुटल्या तरच आम्ही श्रीरामनगर येथे जावू अन्यथा आमच्या जुन्याच गावी राहणार, असा पवित्रा त्यांनी घेवून ३१६ कुटुंबे भर पावसात उघड्यावर राहायला गेली आहेत. त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये १० लाखापैकी ७ लाख रुपये मिळाले. १ हेक्टर जमीनपैकी एकही एकर मिळाली नाही असे सांगितले. ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलामुलींना मोबदला मिळाला पाहिजे अशा मागण्या घेवून बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) अशोक खुणो, उपविभागीय अधिकारी सूर्यवंश्ी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने, तहसीलदार मोटघरे, ठाणेदार केंद्रे, वनक्षेत्राधिकारी दोनोडे, ग्रामसमिती अध्यक्ष भरत पंधरे, जागेश्वर चांदेवार, किशोर शेंडे, राजू शिवणकर, रहेले उपस्थित होते. मात्र यावेळी अपेक्षित तोडगा निघाला नाही. (तालुका प्रतिनिधी)