शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

निवासी अतिक्रमण नियमानुकूल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरत असलेल्या व राज्य शासनाच्या उर्वरित सर्व विभागांच्या (वन विभाग वगळून) नागरी भागात असलेल्या जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चारसदस्यीय समितीची नेमणूक करण्याची सूचना शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  केंद्र शासनाच्या ‘सर्वांसाठी घरे -२०२२’  या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय विभागांच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, असे शासनाच्या वतीने आदेश निर्गमित करून जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठी पाचसदस्यीय समितीची नेमणूक करून समितीने आवश्यकतेनुसार साहाय्यक संचालक, नगररचना विभाग यांच्या सल्ल्याने अतिक्रमण नियमित करण्याची कार्यवाही करावी, असेही नमूद केले. परंतु, अतिक्रमणाच्या प्रश्नासंबंधी जिल्हा प्रशासन उदासीन दिसून येत आहे. यामुळे अतिक्रमणधारक घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या संदर्भात लक्ष वेधून अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष सुशील राऊत यांनी खासदार सुनील मेंढे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरत असलेल्या व राज्य शासनाच्या उर्वरित सर्व विभागांच्या (वन विभाग वगळून) नागरी भागात असलेल्या जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चारसदस्यीय समितीची नेमणूक करण्याची सूचना शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित प्रशासकीय विभागांचा जिल्हा प्रशासकीय प्रमुख, उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नगर परिषद, नगर पंचायत मुख्याधिकारी यांचा समावेश राहणार आहे. तसेच समिती आवश्यकतेनुसार साहाय्यक संचालक, नगररचना विभाग यांच्या सल्ल्याने अतिक्रमण नियमित करण्याची कार्यवाही करावी, असेही नमूद करण्यात आले आहे. परंतु, गोंदिया जिल्ह्यात शासन निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी केली नाही. शासन निर्णय निर्गमित होऊन दोन वर्षे लोटली आहेत. परंतु, गोंदियात एका अतिक्रमणधारकाचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात आले नाही. यामुळे अतिक्रमणधारक प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलापासून वंचित राहत आहेत. गोंदिया नगर परिषदेच्या वतीने २५०० अतिक्रमणधारकांची यादी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर केल्याचे नमूद आहे; परंतु अद्यापही एकाही अतिक्रमण धारकाला घरकुल योजनेचा लाभ घेत आला नाही. याकडे लक्ष केंद्रित करून शासन नियमानुसार अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष सुशील राऊत यांनी केली आहे. ... तर आंदोलन छेडणार - या प्रकरणाचा निकाल १५ दिवसांत लागला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार, असा इशाराही देण्यात आला आहे. या संदर्भात खासदार सुनील मेंढे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सचिन शेंदरे, भाऊ गजबे, यशवंत नेवारे, मनीष राऊत, विक्की वाघाडे, राजा कोहरे, विशाल राऊत, दीपक नेवारे उपस्थित होते.समितीचे गठणच नाही- शासनाने सन २०१९ मध्ये शासन निर्णय निर्गमित करून ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ अंतर्गत अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना यंत्रणेला दिली. यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्याची सूचनाही दिली. परंतु, जिल्ह्यात समितीच स्थापन झाली नसल्याचे अधिकारीच सांगत आहेत. त्यामुळे जवळपास २५०० पेक्षा प्रस्ताव धूळ खात पडून आहेत.

 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना