शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्याचा पुरवठा नियमित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:45 IST

शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा पूर्ववत देण्यात यावा, अशी मागणी आदिवासी आश्रमशाळा संचालक वेलफेअर असोसिएशननेतर्फे करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना यासंदर्भात सोमवारी निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून पुरवठा बंद : परिणय फुके यांना असोसिएशनचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या नियमानुसार अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दराने अन्न- धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील एक वर्षापासून पुरवठाच बंद करण्यात आला आहे. संबंधीत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बाहेरुन अन्न-धान्य खरेदी करावे लागत आहे. अशात पुरवठा पूर्ववत देण्यात यावा, अशी मागणी आदिवासी आश्रमशाळा संचालक वेलफेअर असोसिएशननेतर्फे करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना यासंदर्भात सोमवारी निवेदन देण्यात आले आहे.राज्यात शासनाच्या विविध विभागांतर्गत कल्याणकारी संस्थामार्फत अनेक अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृह असून या शाळा वसतिगृहांना शासनाच्या २००२ च्या शासन निर्णयानुसार बीपीएलच्या दराने अन्न-धान्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र मागील एक वर्षापूर्वी हा पुरवठा बंद करण्यात आला. तर मे २०१९ च्या शासनाच्या नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पत्रानुसार जिल्ह्यातील कल्याणकारी संस्थांमार्फत सुरु असलेल्या अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना २०१७-१८ या सत्रातील देण्यात न आलेले धान्य पुरवठा करण्याचे निर्देश संबंधीत विभागाला देण्यात आले. मात्र, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन कुठलीच कार्यवाही न करता अन्न व धान्यांचा पुरवठा केला नाही. तर ३ मे २०१९ च्या परिपत्रावर कुठलेही स्थगिती आदेश नसताना २९ मार्च २०१९ च्या पत्राचा दाखला देत सदर पुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन याविषयी त्यांना माहिती दिली. यावर त्यांनी अशी कुठलीच बंदी नसल्याचे पदाधिकाºयांना सांगितले. मात्र आता संबंधीत संस्था चालकांवर बाहेरुन अन्न-धान्य घेण्याची वेळ आली असून जे परवडण्यासारखे नाही. मात्र शाळा व वसतिगृह सुरु ठेवता यावे यासाठी हा भार त्यांना सोसावा लागत आहे.तेव्हा शासनस्तरावर याची दखल घेत अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दरात देण्यात येणाºया अन्न- धान्याचा पुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी आदिवासी आश्रमशाळा संचालक वेलफेअर असोसिएशनच्यावतीने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.आदिवासी आश्रमशाळा संचालक वेलफेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने असोसिएशनचे अध्यक्ष चामेश्वर गहाणे यांच्या नेतृत्वात सोमवार येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री फुके यांची भेट घेऊन निवेदन दिले.या वेळी फुके यांनी असोसिएशनच्या समस्या ऐकूण घेत त्यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.शिष्टमंडळात झामसिंग येरणे, केवळराम पुस्तोड, अ‍ॅड.टी.बी.कटरे, यु.टी.बिसेन, सुखदेव दहिवले, राजेंद्र बडोले, लक्ष्मण चंद्रीकापुरे, कोरे, डॉ. फुंडे यांच्या अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.आॅडिटमध्ये द्यावा लागतो बीपीएलचा हिशेबसंचालकांना आपली आश्रमशाळा व वसतिगृह टिकवून ठेवता यावे यासाठी धडपड करावी लागत असून मागील वर्षभरापासून शासनाकडून बीपीएलच्या दराने देण्यात येणारा अन्न -धान्य बंद पुरवठा असल्याने संस्थाचालकांना बाहेर व्यापाºयांकडून खरेदी करावे लागत आहे. मात्र,संस्थेचे आॅडीट करत असताना त्यांना बीपीएलचेच दर दाखवावे लागत असल्याने बाहेरुन घेतलेले अन्न -धान्य देखील आॅडीटमध्ये ग्राह्य धरले जात नाही. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना उपाशीही ठेवता येत नाही. त्यामुळे संस्था चालकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.उपयोगीता प्रमाणपत्र सादरच नाहीकल्याणकारी संस्थांच्या शाळा व वसतिगृहांना बीपीएलच्या दरात अन्न-धान्य, देण्यात यावे यासाठी राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे उपयोगीता प्रमाणपत्र सादर करण्यात येते. त्यानुसार सदर अन्न व धान्य पुरविण्यात येते. मात्र मागील पाच वर्षापूर्वीपासून यात घोळ आहे.आठ दिवसांत तोडगा काढणारअसोसिएशनच्यावतीने राज्यमंत्री डॉ. फुके यांना निवेदन देण्यात आले असता त्यांनी या प्रकरणी संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन आठ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन असोसिएशनच्या पदाधिकाºयांना दिले.