शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सातबारावर महिलांच्या नावाची नोंदणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:36 IST

शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबताना अपघात होवून एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही.

ठळक मुद्देचिरेखनीत संवाद पर्व :तहसीलदार संजय रामटेके यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबताना अपघात होवून एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात वारसांना कोणताही लाभ मिळत नाही. शेतीची सहमालक व विविध योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शेतकºयांनो आपल्या कुटूंबातील मुलीचे, सुनेचे आणि पत्नीचे नाव सातबाºयावर नोंदवा, असे आवाहन तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके यांनी केले आहे.तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथे सार्वजनिक गणेश मंडळ चिरेखनी समाज ग्रामसंस्था व कल्याण ग्रामसंस्था, जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात ते बोलत होते. गटविकास अधिकारी इनामदार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, सरपंच जगन्नाथ पारधी, उपसरपंच सोनू पारधी, विस्तार अधिकारी उके, बन्सोड, कृषीमित्र नंदराम पारधी, पाणलोट समतिीचे सचिव लेखराम राणे, माविमच्या तालुका कार्यक्रम समन्वयक शिल्पा येडे, ग्रामसेवक तिडके उपस्थित होते. एक गाव एक गणपती ही संकल्पना चिरेखनी या गावात प्रत्यक्ष साकारली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक कार्यक्र म आयोजित करण्यात येतात.संवाद पर्व हा कार्यक्रम शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केला जात आहे. शेतकºयांनी आता सेंद्रीय शेती करून पिकांचे उत्पादन घ्यावे, सेंद्रीय शेत मालाला चांगला भाव मिळतो, सेंद्रीय शेतीमुळे विषमुक्त अन्न उपलब्ध होण्यास मदत होते. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावणबाळ या विविध योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गावातील प्रत्येक कुटूंबातील महिला ही बचतगटात सदस्य आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी पैशाच्या बचतीला सुरुवात तर केली आहेच यापुढेही जावून त्या उद्योग व्यवसायाची कास धरीत असल्याचे सोसे यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने संवाद पर्वाच्या आयोजनातून ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे होणार असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष चंद्रकला बिसेन, उपाध्यक्ष रेघन पारधी, सचिव चंद्रकला कुर्वे, सहसचिव जीवनकला पारधी, कोषाध्यक्ष कल्पना रिनाईत, कल्याण ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष पोर्णिमा शहारे, उपाध्यक्ष स्वानंदा कोटांगले, सचिव निला पारधी, सहसचिव अलका कुर्वे, कोषाध्यक्ष मुनेश्वरी भगत, जोती पटले, वैशाली पारधी, प्रणिता राणे, गीता मडावी यांनी सहकार्य केले.तर शासकीय योजनांचा लाभ नाहीस्वच्छ भारत मिशन कार्यक्र माची अंमलबजावणी तालुक्यात करण्यात यावी. गावातील कोणतेही कुटूंब उघड्यावर शौचास जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जे उघड्यावर शौचास जातील त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे इनामदार यांनी सांगितले.