शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

क्षेत्र आरक्षणाने अनेकांना राजकीय वनवास

By admin | Updated: April 23, 2015 00:44 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राचे नव्याने झालेल्या ..

पुनर्रचनेत अनेकांची संधी हुकली : सौभाग्यवतींची वर्णी लावण्यासाठी धडपड सुरूअमरचंद ठवरे  बोंडगावदेवीअर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राचे नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील राजकारण्यांना यावेळी राजकीय वनवासाची पाळी आली आहे. राजकीय सत्ता कोणालाही सोडवेना या नितीने दिग्गज राजकारणी आपल्या सौभाग्यवतींना राजकीय आखाड्यात उतरवून राजकीय किल्ली आपल्याच हातामध्ये ठेवण्याची चाणाक्ष निती अंगीकारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.तालुक्यातील गोठणगाव जि.प.क्षेत्र यावेळी नामाप्रसाठी आरक्षीत ठेवण्यात आला. मागील वेळी सर्वसाधारण महिलासाठी आरक्षीत ठेवण्यात आला होता. सध्या मीना रामरतन राऊत या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. यावेळी नामाप्रसाठी आरक्षीत असल्याने त्यांच्यावर गडांतर आल्याचे दिसते. नवेगावबांध जि.प.क्षेत्र सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत ठेवण्यात आला. मागच्यावेळी अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला होता. सध्या मधुकर मरस्कोल्हे या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सदर क्षेत्र सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षीत झाल्याने मधू यांना राजकीय वनवासात जाण्याची पाळी आलेली आहे. बोंडगावदेवी जि.प.क्षेत्र नामाप्र महिलांसाठी आरक्षीत करण्यात आला. मागील निवडणुकीत सर्वसाधारण जागेसाठी होता. अरविंद शिवणकर या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्षेत्राचा आधार घ्यावा लागणार आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या माहुरकुडा जि.प.क्षेत्र पहिल्या प्रथमच नामाप्रसाठी राखीव करण्यात आला. इटखेडा जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षीत करण्यात आला. मागील वेळी सर्वसाधारण जागेसाठी राखीव ठेवण्यात आला होता. सध्या माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे प्रतिनिधीत्व करीत आहेत. नव्याने निर्माण झालेल्या माहुरकुडा जि.प.क्षेत्रामध्ये उमाकांत ढेंगे यांची पाठराखण केली जाऊ शकते. महागाव जि.प.क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत करण्यात आला. मागील वेळी अनुसूचित जाती महिलासाठी राखीव ठेवण्यात आला होता. पक्षबदल करुन काँग्रेसमध्ये आलेल्या किरण कांबळे सध्या प्रतिनिधीत्व करीत आहेत. क्षेत्र आरक्षणाने त्यांच्यावर राजकीय विजनवासाची पाळी येण्याचे चिन्ह दिसत आहे. केशोरी जि.प.क्षेत्र नामाप्र महिलासाठी राखीव करण्यात आला. मागील वेळी सर्वसाधारण जागेसाठी आरक्षीत करण्यात आला होता. जि.प. बांधकाम समितीचे सभापती प्रकाश गहाणे सध्या या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांचा क्षेत्र नामाप्र महिलांसाठी आरक्षीत करण्यात आल्याने गहाणे यांना नवा क्षेत्र शोधावा लागणार आहे. ना. राजकुमार बडोले यांच्या विश्वासातले समजले जाणारे प्रकाश गहाणे यांना कुठेतरी संधी मिळणार असे बोलल्या जात आहे. तालुक्यातील जि.प. पदाधिकाऱ्यांचे क्षेत्र पूर्वी प्रमाणे न राहता, त्यात बदल झाल्याने अनेकांवर राजकीय वनवासाची पाळी येणार हे ठरलेच आहे. तालुक्यात विद्यमान भाजपा पदाधिकारी आपल्यावर वनवासाची पाळी येवू नये यासाठी आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावण्यात गर्क झालेले दिसत आहेत. राजकीय किल्ली आपल्या हातामध्ये राहावे यासाठी काही जि.प. पदाधिकारी आपल्या सौभाग्यवतींना पुढे करण्यासाठी सध्यातरी चढाओढ सुरू केली आहे. तालुक्यातील पंचायत समिती क्षेत्राचे आरक्षण सोडतीमुळे अनेकांवर राजकीय गडांतर आलेले दिसत आहे. झाशीनगर पं.स. क्षेत्र सर्वसाधारणसाठी आरक्षीत करण्यात आला. यामध्ये झाशीनगर मलकाझरी, चुटीया, दर्रेगाव, कसारी, मोहगाव, खोली, चान्ना, कोडका, पांढरवानी, पांढरवाणी (रै.), रामपुरी, येलोडी, जांभळी, पवनीधाबे, तिडका, सुरतोली, सालई, कुडका, येरंडी/दर्रे, माहुली, कान्होली, धाबेटेडकी, जब्बारटोला. गोठणगाव पं.स. क्षेत्र सर्वसाधारण महिलासाठी आरक्षीत करण्यात आला. यात गोठणगाव, बोंडगाव (सुर.), सुरबन, गंधारी, जांभळी, कोहलगाव, रांजीटोला, रामनगर, संजयनगर, प्रतापगड, जरुघाटा, कढौली, तुकुमनारायण, गवर्रा, केळवद, डोंगरगाव, उमरपायली या गावांचा समावेश आहे. नवेगावबांध पं.स. क्षेत्र अनु.जमातीसाठी आरक्षीत करण्यात आला. यात नवेगावबांध, देवलगाव या गावांचा समावेश करण्यात आला. भिवखिडकी पं.स. क्षेत्र अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षीत करण्यात आला. यात भिवखिडकी, गुढरी, सिरेगाव, सोमलपूर, बिडटोला, भुरसीटोला, सावरटोला, सुरगाव, उमरी, बाक्टी, मुंगली या गावांचा समावेश करण्यात आला आहे. बोंडगावदेवी पं.स. क्षेत्र नामाप्र महिलासाठी आरक्षीत करण्यात आला. यात बोंडगावदेवी, सिलेझरी, घुसोबाटोला, डोंगरगाव, विहिरगाव/बर्ड्या, येरंडी, चान्ना (बाक्टी) या गावांचा समावेश आहे. निमगाव पं.स. क्षेत्र नामाप्रसाठी आरक्षीत करण्यात आला. यात निमगाव, पिंपळगाव, खांबी, अरततोंडी, दाभना, बोरटोला, इंजोरी या गावांचा समावेश आहे. बाराभाटी पं.स. क्षेत्र अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षीत करण्यात आला. यामध्ये बाराभाटी, चापटी, कुंभीटोला, कवठा, डोंगरगाव, सुकळी, खैरी, बोळदे, येरंडी या गावांचा समावेश आहे. माहुरकुडा पं. स. क्षेत्र अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षीत करण्यात आला. यामध्ये बाराभाटी, चापटी, कुंभीटोला, कवठा, डोंगरगाव, सुकळी, खैरी, बोळदे, येरंडी या गावांचा समावेश आहे. माहुरकुडा पं.स.क्षेत्र अनुसूचित जातीसाठी आरक्षीत करण्यात आला. यात माहुरकुडा, मालकनपूर, सिरोली, मोरगाव, महालगाव, तावशी (खुर्द), निलज, रामघाट या गावांचा समावेश आहे. ताडगाव पं.स. क्षेत्र अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षित करण्यात आला. यात ताडगाव, झरपडा, तिडका, करडगाव, धाबेटेकडी, बोळदे/करड, बोदरा, देऊळगाव, सोनेगाव या गावांचा समावेश आहे. इटखेडा पं.स. क्षेत्र सर्वसाधारण महिलासाठी आरक्षीत करण्यात आला. यात इटखेडा, इसापूर, घाटीपळसगाव, कन्हाळगाव, खामखुर्रा, वडेगाव/रेल्वे, येगाव, बुधेवाडा, अरुणनगर पं.स. क्षेत्र सर्वसाधारण जागेसाठी आरक्षीत करण्यात आला. यात अरुणनगर, गौरनगर, जानवा, कोरंभीटोला, मांडोखाल, कोरंभी, अरततोंडी या गावांचा समावेश आहे. महागाव पं.स. क्षेत्र सर्वसाधारण जागेसाठी आरक्षीत करण्यात आला. यात महागाव, येरंडी, बोरी, आसोली, सावरी, नवनितपूर, बुटाई या गावांचा समावेश आहे. केशोरी पं.स. क्षेत्र नामाप्र महिलासाठी आरक्षीत करण्यात आला. यात केशोरी, कनेरी, गार्डनपूर, करांडली, चिचोली, खोकरी, दिनकरनगर, पुष्पनगर अ, पुष्पनगर ब या गावांचा समावेश आहे. भरनोली पं.स. क्षेत्र नामाप्रसाठी आरक्षीत करण्यात आला. यात भरनोली, तिरखुरी, खडकी, राजोली, सायगाव, बडेगाव बंध्या, खोळदा, वारव्ही, आंभोरा, इळदा, जुनेवानी, जांभळी, पोर्ला, परसटोला, अरततोंडी, धमदीटोला, कन्हाळगाव या गावांचा समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या आरक्षणामुळे यावेळी अनुसूचित जातीसाठी एकही जि.प.क्षेत्र आरक्षीत करण्यात आला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकंख्या २४६०४ आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीवर अन्याय झाल्याची ओरड आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्र्यांच्या मतदार संघातच अनुसूचित जातीला आरक्षण प्रणालीमध्ये स्थान देण्यात आले नाही, अशी अनुसूचित जातींच्या लोकांची ओरड आहे.