गोंदिया : मृत व्यक्तींना जीवंत असल्याचे दाखवून त्यांच्या जागी दुसऱ्यांना उभे करण्यात आले. या प्रकरणात आमगाव पोलिसांनी १६ जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे.आमगाव तालुक्याच्या नंगपुरा येथील सुरजलाल अंबर उके (६५) यांनी कालीमाटी येथील गट क्र. ४३०/१ मधील प्लाट आरोपी अंबर दुलीचंद तुरकर (४८) व शोभेलाल भागवत कटरे (३८) यांच्याकडून विकत घेतला होता. परंतु त्या प्लाटची रजीस्ट्री करून देण्यासाठी त्यांनी दोन मृतांच्या जागी दुसऱ्या दोघांना उभे करून त्यांना प्लाटची रजीस्ट्री करवून दिली. या प्रकरणात १६ जणांवर आमगाव पोलिसात भादंविच्या कलम ४२०,४६७,४६८,४७१.३४ अनञवये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये टेकरी येथील अंबर दुलीचंद तुरकर (४८) व शोभेलाल भागवत कटरे (३८), कारू फुलीचंद रहांगडाले (४८) रूपचंद हरी तुरकर (५०), कालीमाटी येथील शामलाल काशिराम दोनोडे (३७), राधेलाल फुलीचंद रहांगडाले (४८) देवचंद फुलीचंद रहांगडाले (५३), किशन रहांगडाले (४४), दुर्योधन रहांगडाले (३८) चिंतामन दुलीचंद रहांगडाले (४०) टेकरी येथील गौरीशंकर फुलीचंद कटरे (३६), मोहरानटोला येथील आनंदा बाबुलाल कटरे (५४), भुरन सोनू बिसेन (५०), मध्यप्रदेशच्या लांजी तालुक्याचतील घुसमारा, टेकरी येथील बायाबाई फुलीचंद तुरकर (८३) व भजीयापार येथील रामलाल यादोराव सोनवाने (४५) यांचा समावेश आहे. सदर आरोपींनी २४ मार्च २००४ पासून सदर प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मृतांना जिवंत दाखवून रजिस्ट्री, १६ जणांवर गुन्हा
By admin | Updated: January 6, 2015 23:03 IST