शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उच्च माध्यमिक शाळा नॉन प्लॅनमध्ये परावर्तित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने गोंदिया जिल्ह्यातील सहा माध्यमिक शाळा आणि तीन उच्च माध्यमिक आदिवासी क्षेत्रातील शाळा आदिवासी ...

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने गोंदिया जिल्ह्यातील सहा माध्यमिक शाळा आणि तीन उच्च माध्यमिक आदिवासी क्षेत्रातील शाळा आदिवासी उपयोजना प्लॅनमध्ये समाविष्ट करून या शाळांत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते आदिवासी विभागाच्या आदिवासी घटक योजनेतून अदा केले जातात. टीएसपी योजनेतील शाळांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित मिळत नसल्यामुळे आदिवासी उपयोजना प्लॅनमधील शाळा नाॅन प्लॅनमध्ये परावर्तित करून कार्यरत शिक्षक, व्याख्याता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते नियमित देण्याची मागणी शिक्षक भारती संघटना अर्जुनी मोरगाव यांनी केली आहे.

शिक्षण विभागाने आदिवासी क्षेत्रातील शाळांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सहा माध्यमिक शाळा आणि तीन उच्च माध्यमिक शाळांचा काही विशिष्ट कालावधीसाठी समावेश करून शिक्षणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहे. या योजनेतील शाळांमध्ये कार्यरत शिक्षक, व्याख्याता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते आदिवासी घटक योजनेतून आदिवासी विकास विभाग शालेय शिक्षण विभागाला निधी प्रदान करून देण्याची प्रचलित पध्दत आहे. ही योजना केवळ पाच वर्षांकरिता राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. शैक्षणिक वर्ष २०००-२००१ पासून अनुदानावर आलेल्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना सन २००५-२००६ मध्ये आदिवासी उपयोजना प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये परावर्तित केले होते. त्यानंतर मात्र पंधरा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही टीएसपी प्लॅनमधून शिक्षक, व्याख्याता, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनियमित स्वरूपात वेतन व भत्ते देणे सुरू आहे. या योजनेचा निधी दर महिन्याला उपलब्ध होत नसल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असतो.

.............

शासनाकडून वेठीस धरण्याचा प्रयत्न

शासन याकडे दुर्लक्ष करून हेतुपुरस्सर टीएसपी प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये परावर्तित करण्याची कार्यवाही रखडल्याचा शिक्षण संघटनांनी आरोप करून शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणाची दखल घेऊन शासनाने गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना टीएसपी प्लॅनमधील शाळा त्वरित नॉन प्लॅनमध्ये परावर्तित करून कार्यरत शिक्षक, व्याख्याता, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते नियमित अदा करावे, अशी मागणी अर्जुनी मोरगाव शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनात केली आहे.