शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कारवायांत घट; मात्र लाचखोरी थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : अगोदर आलेल्या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था हादरून गेली होती. त्यानंतर आता मागील वर्षापासून कोरोनाने अर्थव्यवस्थेचे वाटोळेच करून ...

कपिल केकत

गोंदिया : अगोदर आलेल्या नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था हादरून गेली होती. त्यानंतर आता मागील वर्षापासून कोरोनाने अर्थव्यवस्थेचे वाटोळेच करून टाकले आहे. कोरोनामुळे मागील वर्षापासून कित्येकांच्या हातचे रोजगार हिरावले गेले आहेत; तर कित्येक उद्योगधंदे बंद पडले असून काम देणाऱ्या हातांनाच आता काम मागण्याची वेळ आल्याचेही दिवस पाहावयास मिळत आहेत. लोकांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही लाचखोरांना मात्र त्याचे काहीच सोयरसुतक नाही. परिणामी कोरोनाकाळातही लाचखोर माणुसकी सोडून पैशांची सर्रास मागणी करीत आहेत. कोरोनापूर्वी जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या कारवायांत घट दिसून येत असली तरीही सन २०२१ मधील सहा महिन्यांत सहा कारवाया करण्यात आल्या आहेत. म्हणजेच, कारवायांत घट असली तरी लाचखोरी मात्र थांबली नसल्याचे दिसत आहे.

-------------------------------

वर्ष लाच प्रकरणे (ग्राफ)

२०१६ २६

२०१७ १६

२०१८ २५

२०१९ २२

२०२० १६

२०२१ (जुलैपर्यंत) ०६

-----------------------------

ग्रामविकास विभाग सर्वांत पुढे

- जिल्ह्यात ग्रामविकास विभाग (जिल्हा परिषद-पंचायत समिती) सन २०१६ मध्ये बघितल्यास विभागाने पाच कारवायांत सहा लाचखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

- सन २०१८ मध्ये ग्रामविकास विभागात सर्वाधिक आठ कारवाया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्या असून, यामध्ये नऊ लाचखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

- सन २०२१ मध्ये जुलैपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण सहा कारवाया केल्या आहेत. मात्र त्यात एक कारवाई ग्रामविकास विभागात असून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------

लाच दोनशेपासून दोन लाखांपर्यंत !

घरकुलसाठी २०० रुपयांची लाच

जिल्ह्यात सन २०१८ मध्ये ग्राम रोजगार सेवकाने एकाला घरकुल मंजूर करवून देण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली होती. ते जिल्ह्यातील सर्वांत कमी रकमेचे लाचेची मागणी करण्याचे प्रकरण आहे.

---------

रेतीघाटांवर धाड न घालण्यासाठी दोन लाखांची लाच

सन २०१६ मध्ये जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याने रेतीघाटांवर कारवाई न करण्यासाठी येथील रेती व्यावसायिकांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. ही जिल्ह्यातील सर्वांत जास्त रकमेची मागणी होती.

------------------------------------

न घाबरता पुढे या...

काम करून देण्यासाठी सर्वत्र लाचेची मागणी केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. पैशांची मागणी करणे बेकायदेशीर असून, कुणीही पैशांची मागणी केल्यास न घाबरता पुढे यावे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी तत्पर आहे.

- रमाकांत कोकाटे

निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग