शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

लाल डोक्याचा भारीट, दलदली भोवत्या आढळला

By admin | Updated: March 17, 2016 02:43 IST

देवळी परिसरात लाल डोक्याचा भारीट आणि दलदली भोवत्या हे दोन पक्षी पहिल्यांदाच आढळले.

पक्षीमित्रांमध्ये आनंद : बहार नेचर फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी केली नोंदवर्धा : देवळी परिसरात लाल डोक्याचा भारीट आणि दलदली भोवत्या हे दोन पक्षी पहिल्यांदाच आढळले. स्थानिक बहार नेचर फाऊंडेशनने या दोन्ही पक्षांची नोंद घेतल्याने पक्षिमित्रांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.लाल डोक्याच्या भारीट पक्ष्याला मराठीत रक्तीशीर्ष भरीट तर इंग्रजीमध्ये ‘रेड हेडेड बटींग’, असे म्हंटले जाते. हा पक्षी प्रामुख्याने बलुचिस्तानमध्ये आढळतो. हिवाळ्यात या पक्ष्यांचे थवे भारतात येतात. चिमणीपेक्षा मोठ्या आकाराच्या पक्ष्याचा डोळा, गळा हा लाल रंगाचा असतो. पोटाच्या खालचा भाग पिवळ्या रंगाचा असून पाहताक्षणी नागरिकांचे लक्ष वेधून घेतो. हा पक्षी केवळ झुडपी जंगलात आढळतो. मार्च महिना संपल्यानंतर या पक्ष्यांचा थवा मायदेशी रवाना होतो. दलदली भोवत्या पक्ष्याला पाणघार, असे म्हणतात. ‘एक्सिपिट्रीडी’ या कुलात येणाऱ्या या पक्ष्यांचे शास्त्रीय नाव ‘सर्कल ऐरूजिनस’ असे आहे. तपकिरी रंगामुळे गावखेड्यात घारपक्षी हेच नाव प्रचलित आहे. हिवाळ्यात पाहुणे म्हणून आलेल्या या पक्ष्याचे दर्शन दुर्मिळ आहे. दलदली भोवत्याची नोंद वर्धा शहरानजिक दिग्रस तलावावर करण्यात आली, असे बहार नेचर फाऊंडेशनचे सुभाष मुडे, अविनाश भोळे, विनोद साळवे, घनश्याम माहुरे, बुद्धदास मिरगे, राहुल वकारे, सारंग फत्तेपुरिया, पवन दरणे, सारिका मून, चित्रा इंगोले, दर्शन दुधाणे, निखिल खोडे, श्रेयस ठाणेकर, जयंत महाजन, नरेश वाघ आदींनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)