शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१,७८३ विक्रेत्यांकडून १३.२९ लाखांची वसुली

By admin | Updated: May 6, 2017 00:52 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या विविध रेल्वे स्थानकांत व रेल्वेगाड्यांमध्ये सन २०१६-१७ मध्ये विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या विविध रेल्वे स्थानकांत व रेल्वेगाड्यांमध्ये सन २०१६-१७ मध्ये विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले. यात अनधिकृत खाण्यापिण्याचे साहित्य विकणाऱ्या (व्हेंडर्स) एक हजार ७८३ विक्रेत्यांवर कारवाई करून दंड स्वरूपात १३.२९ लाख रूपये वसूल करण्यात आले. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल यांच्या नेतृत्वात वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गाड्या व रेल्वे स्थानकांमध्ये विशेष तपासणी अभियान नियमितपणे राबविण्यात येते. याच श्रृंखलेत सन २०१६-१७ दरम्यान मंडळातील विविध गाड्या तथा रेल्वे स्थानकात विशेष तपासणी अभियानांतर्गत अनाधिकृत एक हजार ७८३ विक्रेत्यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. तसेच दंड म्हणून त्यांच्याकडून १३.२९ लाख रूपयांची वसुली करण्यात आली. बाहेरील विक्रेत्यांना रेल्वे स्थानक व गाड्यांमध्ये खाण्यापिण्याचे साहित्य विकण्याची अनुमती नाही. असे प्रकरण लक्षात येतात त्याची तक्रार रेल्वे कर्मचारी किंवा हेल्प लाईन किंवा टोल फ्री क्रमांकावर करावी, असे आवाहनही प्रवाशांना केले आहे. यामागे कायदेशीर कारवाई व खाण्याच्या वस्तूंच्या गुणवत्तेप्रती रेल्वे प्रशासन सतर्क रहावे, हा हेतू आहे.