शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यात १.१४ कोटीच वसूल

By admin | Updated: November 21, 2015 02:11 IST

मागील वर्षी केलेल्या गोंदिया नगर पालिकेने कर वसुलीत केलेल्या अभूतपूर्व कामगिरीनंतर यावर्षी पुन्हा ढेप खाल्ली आहे.

करवसुली थंडावली: कसे गाठणार ९.६५ कोटी वसुलीचे लक्ष्य?गोंदिया: मागील वर्षी केलेल्या गोंदिया नगर पालिकेने कर वसुलीत केलेल्या अभूतपूर्व कामगिरीनंतर यावर्षी पुन्हा ढेप खाल्ली आहे. यंदा पालिकेला नऊ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांची करवसुली करण्याचे लक्ष्य आहे. मात्र आतापर्यंतच्या सात महिन्यात त्यातील फक्त १.१४ कोटीच वसुल होऊ शकले. त्यामुळे करवसुलीचे लक्ष्य गाठणार तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आता कर वसुली विभागात नवीन कर निरीक्षक रूजू झाले असून हे लक्ष्य पूर्ण करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. कर वसुलीदरम्यान राजकीय अडसर येत असल्याने कर थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढतच चालला आहे. हे जरी उघड सत्य असले तरी पालिकेचे कर्मचारी मात्र काही बोलण्यास तयार नाही. परिणामी पालिकेला आजघडीला जुन्या थकीत करापोटी ५ कोटी ५१ लाख ७११६ रूपये तर चालू वर्षाच्या करापोटी ४ कोटी १४ लाख ३४ हजार ८७६ रूपये असे एकूण ९ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांची करवसुली करावयाची आहे. यात पालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या काळात ७४ लाख चार हजार २१४ रूपये थकीत व ४० लाख १५ हजार ७८७ रूपये चालू अशी एकूण एक कोटी १४ लाख २० हजार रूपयांची वसुली केली आहे. हा करवसुलीचा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमीच आहे. मागील वर्षी पालिकेला सुमारे ११ कोटींच्या कर वसुलीचे टार्गेट होते.मागील वर्षी कर वसुलीचे हे प्रकरण ‘लोकमत’ने चांगलेच उचलून धरले होते. करवसुली योग्य प्रमाणात झाली नाही तर नगर पालिकेला कारभार चालविणे कसे कठीण होणार हे वेळोवेळी ‘लोकमत’ने निदर्शनास आणून देण्यासोबतच लोकांमध्येही जागृतीचे काम केले होते. त्यानंतर करवसुलीच्या या गंभीर बाबीकडे लक्ष देत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी नगर पालिकेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांचा क्लासच घेतला होता. त्यांचे पगारही थांबविण्यात आले होते. परिणामी पालिकेने सक्रियता दाखवित कर वसुलीलाठी विशेष पथक गठीत करून वसुली अभियान राबविले होते. विशेष म्हणजे कर वसुली पथकासह खुद्द मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना सुद्धा मैदानात उतरावे लागले होते. याचे फलित असे झाले की, मागील वर्षी पालिकेची ५१.७२ टक्के करवसुली झाली होती. त्यामुळे यंदा कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडून काय पाऊल उचलले जाते यावर यंदाची करवसुली अवलंबून राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)