शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दररोज होत आहे बाधितांच्या संख्येचा ‘रेकॉर्डब्रेक’वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 05:00 IST

मागील वर्षीपासून कोरोनाने कहर केला असून, मध्यंतरी काही महिन्यांत स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत होते. मात्र, नववर्षात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. देशात सर्वात गंभीर स्थिती महाराष्ट्राची असून, त्याचे पडसाद आता जिल्ह्यातही दिसून येत आहेत. मागील वर्षी नव्हती तेवढी रूग्ण संख्या यंदा नोंदली जात आहे. यामुळेच आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. 

ठळक मुद्देरुग्णसंख्येत दररोजची वाढ : मृतांच्या संख्येनेही आकडा मोडला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना कहर दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालला असून, परिस्थिती आता हाताबाहेर जाताना दिसत आहे. अशीच काहीशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असून, वाढत्या रुग्ण संख्येमुळे धडकी भरू लागली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षापेक्षा यंदाची आकडेवारी जास्त असून, त्यात दररोज भर पडत आहे. यामुळेच यंदा बाधितांच्या संख्येमुळे दररोज ‘रेकॉर्डब्रेक’ होत आहेत. मागील वर्षीपासून कोरोनाने कहर केला असून, मध्यंतरी काही महिन्यांत स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसत होते. मात्र, नववर्षात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला आहे. देशात सर्वात गंभीर स्थिती महाराष्ट्राची असून, त्याचे पडसाद आता जिल्ह्यातही दिसून येत आहेत. मागील वर्षी नव्हती तेवढी रूग्ण संख्या यंदा नोंदली जात आहे. यामुळेच आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. मागील वर्षी बाधितांची संख्या ४०० पर्यंत नोंदविली गेली होती. यंदा मात्र,१५ ते २० दिवसांतच बाधितांची संख्या तब्बल ५०० वर गेली आहे. विशेष म्हणजे, बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून, त्यात दररोज वाढ होतानाच दिसत आहे. हेच कारण आहे की, बाधितांची संख्या आता १८२२० वर गेली आहे. एकंदर जिल्ह्याची स्थिती बघता दररोज बाधितांची संख्या वाढत असल्याचे दररोज ‘रेकॉर्ड ब्रेक’ होत असून,  एक नवा ‘रेकॉर्ड’ तयार होताना दिसत आहे. 

आतातरी गांभीर्याने घेण्याची गरज जिल्ह्यातील बाधितांची आकेडवारी आता ५०० वर जात असून, त्यात वाढ होतच आहे. शिवाय मृतांची संख्याही वाढत असताना नागरिकांत काहीच गांभीर्य दिसून येत नाही. ही मात्र शोकांतिका आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या कितीतरी पट जास्त रूग्ण व मृत्यू गोंदिया तालुक्यातील आहेत. यात शहराचीच आकडेवारी सर्वाधिक असूनही शहरवासीयांना काहीच फरक पडलेला दिसत नाही. मात्र, आताची स्थिती बघता नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या