संतोष बुकावन अर्जुनी मोरगावनामांकन परतीनंतर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या उमेदवारात पाच कोट्यधीश उमेदवार आहेत. सर्वाधिक संपत्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्याकडे तर प्रमुख पक्षाच्या उमेदवारांमधून सर्वात कमी संपत्ती काँग्रेसचे उमेदवार राजेश नंदागवळी यांच्याकडे आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारी दाखल करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या संपत्तीचे विवरणपत्र दाखल करणे आवश्यक असते. प्रत्येक उमेदवारांनी आपापल्या संपत्ती मनोहरराव चंद्रीकापुरे यांचेकडे ४ कोटी ३६ लाख ८० हजार ५०० रुपयांची आहे. तर सर्वात कमी संपत्ती राजेश नंदागवळी यांचेकडे १३ लाख १५ हजर रुपये एवढी आहे. सर्वाधिक संपत्ती असलेल्या चंद्रीकापुरे यांचेकडे पत्नी व स्वत:चे नावे ६१ लाख ४० हजार रुपयांची मालमत्ता आहे. ११ लाख ४० हजार ५०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. स्थावर मालमत्ता खरेदीनंतर यावरील बांधकामाचा खर्च ३७ लाख रुपये आहे. चालु बाजारभावाप्रमाणे या संपत्तीचे मूल्य २ कोटी ७० लाख रुपयाचे आहे. पत्नीच्या नावे हे मुल्य ४५ लाख रुपये वारसा हक्काने प्राप्त मालमत्तेचे मूल्य १० लाख रुपये याप्रकारे एकूण संपत्ती ४ कोटी ३६ लाख ८० हजार तर चंद्रिकापुरे यांचे पत्नीचे नावे ७ लाख रुपयांचे बँक वित्तीय कर्ज आहे. यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमराव मेश्राम यांचेकडे ३ कोटी ५३ लाख १८ हजार ६६६ रुपयांची मालमत्ता आहे. यात स्वत:च्या नावे २२ लाख ३० हजार रुपये, पत्नीचे नावे ९ लाख ४८ हजार ६६६ रुपय तर मुलांचे नाव १ लाख १८ हजार ६०० रुपयांची जंगम मालमत्ता आहे. स्वत:चे नावे २५ लाख ६१ हजार ५०० रुपये, पत्नीचे नावे २७ लाख व मुलांचे नावे ११ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. मालमत्ता खरेदीनंतर बांधकाम मूल्य स्वत:चे नावे ६१ लाख २६ हजार ५०० रुपये तर पत्नीचे नावे १२ लाख रुपयांचे आहे. चालू बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत स्वत:चे नावे ९५ लाख, पत्नीचे नावे ७३ लाख व मुलांचे नावे १६ लाख रुपये आहे. स्वत: संपादित केलेल्या मालमत्तेच्या विवरणानुसार स्वत:चे नावे १ कोेटी ९ लाख १८ हजार रुपये, पत्नीचे नावे ४८ लाख ४८ हजार ६६६ रुपये तर मुलांचे नावे ११ लाख ४६ हजार रुपये आहे. या कुटूंबात स्वत:वर ८० हजार, पत्नीवर ७ लाख ७५ हजार व मुलांवर ९० हजाराचे कर्ज आहे. या निवडणुकीत डॉ. मेश्राम हे बहुजन समाज पार्टीकडून रिंगणात आहेत.भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनातर्फे रिंगणात असलेल्या किरण कांबळे यांचेकडे २ कोटी ९६ लाख २६ हजाराची मालमत्ता आहे. कांबळे यांनी ८८ लाख २६ हजार रुपयांची मालमत्ता स्वत: संपादित केली आहे. खरेदी नंतरचे बांधकाम मूल्य १० लाखांचे आहे. संपत्तीची चालू बाजार किंमत १ कोटी ९० लाख रुपयांची आहे. भाजपचे उमेदवार राजकुमार बडोले यांचेकडे १६ लाख ६८ हजार ३०२ रुपये, पत्नीचे नावे ७ लाख ४४ हजार १७६ रुपये तर मुलांचे नावे १ कोटी ६२ लाख ५७ हजार ३९३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. आ. बडोले यांचेकडे स्वत:चे नावे २३ लाख ५ हजार तर पत्नीच्या नावे ८ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. बडोले यांनी ३ लाख ५ हजार तर पत्नीचे नावे ३ लाख रुपयांच्या मालमत्ता संपादन खरेदी आहे. खरेदीनंतर बांधकाम मूल्य ११ लाख रुपये आहे. बडोले यांनी स्वत: संपादित केलेली मालमत्ता ३० लाखाची तर पत्नीचे नावे ८ लाख रुपये आहे. वारसाप्राप्त मालमत्ता १० लाख रुपये आहे. बडोले यांचेवर १ लाख ७३ हजार १७९ रुपये तर मुलांचे नावे १६ लाख १५ हजार ६ रुपयांचे कर्ज आहे. काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार अजय लांजेवार यांचेकडे २७ लाख ४५ हजार २५२ तर पत्नीचे नावे १८ लाख ४९४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांनी १९ लाख ४७ हजार तर पत्नीने २० हजार रुपयाची स्वत: संपादित केलेली मालमत्ता आहे. खरेदीनंतर बांधकामाचा खर्च १५ लाख रुपये आहे. चालू बाजार मूल्य स्वत:चे नावाचे ६२ लाख तर पत्नीचे नावे १ लाख रुपये आहे. त्यांचेकडे ३१ लाख ३ हजार ४०७ रुपयांचे कर्ज आहे. काँग्रेसचे उमेदवार राजेश नंदागवळी यांचेकडे १ लाख ६२ हजार तर पत्नीचे नावे १ लाख ३५ हजाराची जंगम मालमत्ता आहे. स्थावर मालमत्ता एक रिकामा प्लाट आहे. मालमत्तेची खरेदी १ लाख ८० हजार रुपयांची आहे. चालु बाजार मुल्य ८ लाख ३८ हजार रुपयांचे आहे, तर त्यांचेकडे ९० हजारांचे कर्ज आहे.
कोट्यधीशांचा सुकाळ
By admin | Updated: October 3, 2014 01:46 IST