शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

विद्यार्थ्यांसाठी वाचन कट्टा नवोपक्रम

By admin | Updated: March 26, 2016 01:44 IST

येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वाचन कट्टा नवोपक्रमांंतर्गत वाचन कट्टा तैयार करण्यात आला आहे.

इंदोरा बुज : येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वाचन कट्टा नवोपक्रमांंतर्गत वाचन कट्टा तैयार करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम चालू आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत संपूर्ण शाळेत ज्ञानरचना वादी पद्धतीने, अध्यापन आस्थापन होत आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अभ्यासात आनंद निर्माण व्हावा म्हणून वाचन कट्टा तयार करण्यात येत आहे.वाचन कट्ट्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष दिगंबर अंबुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य लाखन राणे, विमला सोनेवाने, संगीता अंबुले, राजेंद्र बन्सोड, सरिता सोनेवाने, राजेंद्र अंबुले व पालक वर्ग उपस्थित होते. मुख्याध्यापक पी.एल. भगत यांनी उपस्थित पालकांना वाचन कट्टयाचे महत्व समजावून सांगितले.विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी लोक सहभागातून वाचन कट्टा तयार करुन त्यातून गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम यातून केले जाईल. गावकऱ्यांच्या व बालकांच्या मदतीने वाचन कट्टा तैयार करुन खुल्या वातावरणात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सवय व्हावी या मागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. वाचन कट्ट्यात बसून दररोज विद्यार्थी गटचर्चा, सराव व कृतीयुक्त अध्ययन करतील असे शिक्षण विभागाचे उपक्रम असल्याही माहिती देण्यात आली. यावेळी सहाय्यक शिक्षक शैलेष कोचे, विजय पटले, अशोक बिसेन, आगासे, साकुरे, चंद्रवंशी विद्यार्थी-पालक उपस्थित होते.