शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गरजूंपर्यंत योजना पोहोचवा!

By admin | Updated: September 29, 2016 00:19 IST

तळागाळातील शोषित, पीडित, वंचितांना न्याय मिळवून देवून समाजात अंतिम घटकावरील व्यक्तीचा

विनोद अग्रवाल : पं. दीनदयाल उपाध्याय जयंती कार्यक्रमगोंदिया : तळागाळातील शोषित, पीडित, वंचितांना न्याय मिळवून देवून समाजात अंतिम घटकावरील व्यक्तीचा विकास करुन त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य पं.दिनदयाल यांच्या प्रेरणेने पक्ष करीत आहे. कार्यकर्त्यांनी समाजातील गरजूपर्यंत योजना पोहोचवून गरिबांचे अश्रू पुसण्याचे कार्य करावे, असे आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले. ते भाजपा जिल्हा कार्यालयात पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सोमवारी बोलत होते. शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत प्रामुख्याने नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, जि.प. सभापती छाया दसरे, न.प. गटनेता दिनेश दादरीवाल, संपर्क प्रमुख संजय कुळकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, भरत क्षत्रिय, दीपक कदम, जयंत शुक्ला, मनोहर आसवानी, महेश आहुजा, विनोद किराड, अशोक हरिणखेडे उपस्थित होते. सर्वप्रथम पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. अग्रवाल पुढे म्हणाले, एकात्म मानववाद व अंत्योदयचे प्रणेते पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या तत्व व आदर्शावर चालून भारतीय जनता पार्टी कार्य करीत आहे. पं. दिनदयाल उपाध्याय हे मोठे अर्थशास्त्री, समाजशास्त्री, साहित्यिक, वक्ता, लेखक व पत्रकार होते. ते एक महान विचारवंत व कुशल संघटक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी दिले असून त्यांनी आपल्या विचाराने देशाला नवी दिशा दिली. हे वर्ष त्यांच्या शंभराव्या जयंतीचे वर्ष आहे.माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी एकात्म मानववाद व अंत्योदयाच्या सिद्धांतावर चालून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, अंत्योदय अन्न योजना, सर्व शिक्षा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना व अनेक जनकल्याणकारी योजना सुरू करुन देश्विकासाला चालना दिली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना, मुद्रा योजना, आवास योजना, कौशल्य विकास योजना, उज्वला योजना, जीवनज्योती योजना, स्वच्छ भारत अभियान, दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना व अंत्योदय योजना यासारख्या अनेक योजनांतून समाजातील शेवटच्या घटकाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सर्वांगिण प्रगती साधण्याकरिता वेगाने वाटचाल सुरू झाली असल्याचे ते म्हणाले.नगराध्यक्ष जायस्वाल यांनी सांगितले की आज शासनाने सुरू केलेल्या योजनांमुळे निश्चितच सर्वसामान्यांना न्याय मिळू लागले आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी कार्य केले जात असल्याचेही ते बोलले. या वेळी तालुक्यातील लोहारा येथील ए.टी. मेश्राम यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी छत्रपाल तुरकर, दिनेश दादरीवाल, भरत क्षत्रिय, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन पंकज रहांगडाले यांनी केले. बैठकीस प्रामुख्याने शहर महामंत्री बाबा बिसेन, अशोक जयसिंघानिया, चंद्रभान तरोणे, धमेंद्र डोहरे, कुशल अग्रवाल, संजय मुरकुटे, अमित झा, पंकज सोनवाने, अहमद मणियार, अजित मेश्राम, मैथिली पुरोहित, धनंजय रिनायत, परसराम हुमे, रतन वासनिक, टिटूलाल लिल्हारे, एजाज शेख, अजय लौंगानी, सुभान रहांगडाले, राकेश लांजेवार, विनोद बन्सोडे, बबलू रहांगडाले, वजीर बिसेन, मिलिंद बागडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)