शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

¦ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

बोंडगावदेवी : तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचांची संयुक्त सभा नुकतीच घेण्यात आली. त्यात तालुकास्तरावरील ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी सिरेगावबांधचे सरपंच ...

बोंडगावदेवी : तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचांची संयुक्त सभा नुकतीच घेण्यात आली. त्यात तालुकास्तरावरील ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी सिरेगावबांधचे सरपंच इंजि. हेमकृष्ण ऊर्फ दादा संग्रामे यांची दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली, तर सरचिटणीसपदी महालगाव ग्रामपंचायतचे सरपंच अशोक कापगते यांची निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत स्तरावर उद्‌भवणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर सरपंच सेवा संघ स्थापन करण्यात आले. तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचांची सभा सोमवारी (दि.१९) पंचायत समितीच्या बचत भवनात संघाचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. सभेत ग्रामपंचायत स्तरावरील समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संघाच्या तालुका ग्रामपंचायत सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी संग्रामे यांची फेरनिवड, तर सरचिटणीसपदी कापगते यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय खाकडे (कान्होली), प्रकाश शिवणकर (खांबी), प्रभाकर कोवे (महागाव), युवराज तरोणे (सावरटोला), महिला उपाध्यक्ष शुभांगी तिडके (तुकूमनारायण), कुंदा डोंगरवार, सरिता लंजे, सहसरचिटणीस डॉ. अंजय अंबादे, भोजराम लोडगे, कोषाध्यक्ष हेमराज पु्स्तोडे, प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मीकांत नाकाडे, किशोर ब्राह्मणकर, मार्गदर्शक रघुनाथ लांजेवार, कार्यकारी सदस्य नंदू पाटील गहाणे, भगवान नाकाडे, पपिता नंदेश्वर, अनिल पालीवाल, विश्वनाथ बाळबुद्धे, बाबूल बलिक, लीलेश्वर खुणे, दीपक सोनवाने, विलास फुंडे, सोनिया वाढई, सुजाता गुडेकर, सुनीता मस्के आदींचा समावेश आहे. संचालन व प्रास्ताविक संग्रामे यांनी केले. आभार डॉ. अजय अंबादे यांनी मानले.