शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिधा वाटपात अनियमिततेचा आरोप

By admin | Updated: June 17, 2016 02:08 IST

येरंडी-देवी येथील शिधापत्रिका धारकांना धान्यवाटप करताना सावळागोंधळ करीत असल्याची तक्रार शिधाधारकांनी केली आहे.

अर्जुनी-मोरगाव : येरंडी-देवी येथील शिधापत्रिका धारकांना धान्यवाटप करताना सावळागोंधळ करीत असल्याची तक्रार शिधाधारकांनी केली आहे. तालुका प्रशासनाकडे तक्रार करूनही याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोपही शिधाधारकांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, धनराज दोनोडे, सईबाई थेर, रामदास ब्राम्हणकर यांच्याकडे प्रत्यक्ष कमी लाभधारक असतानाही अधिकचे दर्शविण्यात आले. मात्र त्यांना प्रत्यक्षात कमी धान्य दिले जात असल्याने आरोप केला जात आहे. बोंडकू ब्राम्हणकर, तुकाराम रामटेके, मारुती रामटेके, मनोराम दोनोडे, देविदास हेमणे, इस्तारी तवाडे, महादेव तरोणे, सहादेव ब्राम्हणकर, पोवरा बहेकार, केवळराम दोनोडे तसेच अत्यंत गरीब असलेल्या शिधा धारकांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नाही. मृत शिधाधारकांचे धान्य हडप केले जाते. ग्रामपंचायतच्या ठरावांना न जुमानता मर्जितील सधन शेतकऱ्यांची नावे अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. केवळ १ ते २ दिवस अन्नधान्याचे वाटप केले जाते व उर्वरित धान्य हडप केले जाते. धान्य विक्रीची पावती दिली जात नाही. शासकीय दरापेक्षा अधिकचे पैसे घेतले जातात. फलकावर धान्याचे वितरण व दर लिहिले जात नाही. दारिद्र्यरेषेखालील लाभधारकांना कमी धान्य दिले जाते. दर महिन्याला ५५० ते ६०० लिटर केरोसिनचा पुरवठा होतो. मात्र परिपत्रकानुसार वाटप केले जात नाही. गहू, तांदूळ, साखरेचा पुरवठा होऊनही तुमचे धान्य आले नाही असे सांगून परत पाठविले जाते. यात लतेश बहेकार, जनार्धन दोनोडे, किशोर बोरकर, रामेश्वर लोगडे, हेमराज हेमणे, हिवराज कोरे, गोवर्धन बहेकार, उदाराम शिवणकर, शंकर लोगडे, जसवंता दोनोडे, नकटू मेंढे, पांडुरंग बहेकार, श्रीराम बहेकार, आसाराम मेंढे यांना धान्य मिळत नसल्याची तक्रार आहे. अंत्योदय अन्न योजनेसाठी विहीरगाव-बरड्या येथील ५ व येरंडी देवी येथील ६ लाभार्थ्यांची निवड करुन आमसभेत ठराव घेण्यात आला. ही यादी अंमलबजावणीसाठी ११ डिसेंबर २०१३ रोजी तहसील कार्यालयात पाठविण्यात आली. मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. अनेकदा तक्रार करुनही कुठलीच कारवाई केली जात नाही. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बकाराम ब्राम्हणकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)