शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

रासेयो पथकाने बांधला गावालगत वनराई बंधारा

By admin | Updated: December 10, 2014 23:01 IST

येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबिर १ ते ७ डिसेंबर या कालावधीत तालुक्यातील अरततोंडी/दाभना येथे घेण्यात आले. शिबिरांतर्गत रासेयो पथकाने

अर्जुनी/मोरगाव : येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबिर १ ते ७ डिसेंबर या कालावधीत तालुक्यातील अरततोंडी/दाभना येथे घेण्यात आले. शिबिरांतर्गत रासेयो पथकाने अरततोंडी/दाभना लगतच्या वन परिसरात वन्य प्राणी व शेतकरी यांना पाणी मिळावे या दृष्टीने लगतच्या नाल्यावर श्रमदान करून वनराई बंधारा बांधला.रासेयो पथकाच्या शिबिराचे उद्घाटन को-आॅप. बँकेचे संचालक भोजराज रहिले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सरिता पातोडे होत्या. तर उपसरपंच मोरेश्वर रहिले, उपप्राचार्य वीणा नानोटी, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद हत्तीमारे, प्राथ. शाळा मुख्याध्यापिका आर.व्ही. गोंडाणे, भागवत मुनेश्वर, लीला ब्राह्मणकर, सुनीता मेश्राम, संदीप उईके, रासेयो प्रभारी प्रा. जे.डी. पठाण, प्रा. आर.व्ही. सूर्यवंशी, प्रा.ए.एम. नंदेश्वर, प्रा.नंदा लाडसे प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरादरम्यान रासेयोच्या पथकाने नाल्याचे खोदकाम, गटारे स्वच्छ, रस्त्यांची डागडुजी इत्यादी कामे केली. बौद्धिक कार्यक्रमांतर्गत प्रा.ओ.डी. लांजेवार यांनी पर्यावरण व मानवी जीवन, प्रा. एस.जी. भोयर यांनी मानवी मूल्य व राष्ट्रीय सेवा योजना तर आरोग्य सेवक पी.एस. पातोडे यांनी स्वच्छता आणि आरोग्य इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले. एस. एस.जे. महाविद्यालयाचे प्रा. शरद मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक सामाजिक क्रांतीचे पर्व या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पारस वंजारी, शिवानी जांभुळकर व इतर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. रासेयो शिबिराचा समारोपीय कार्यक्रम सरपंच सरिता पातोडे यांच्या अध्यक्षतेत महागाव येथील शामाप्रसाद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.बी.जी. पटले, शामराव बहेकार, जे.एस. राठी यांच्या उपस्थितीत पार पडला. सात दिवसीय शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. पठाण, प्रा. अनिल नंदेश्वर, प्रा. रामदास सूर्यवंशी, प्रा. यादोराव बुरडे, प्रा. नंदा लाडसे, प्रा. योगेंद्र गौतम, प्रा. टी.एस. बिसेन, प्रा.संदीप भोयर, प्रा. कांबळे, रासेयो पथकाचे विद्यार्थी व अरततोंडी येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन रासेयो पथक विद्यार्थी अंशुल भोवते यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. जे.डी. पठाण यांनी मानले.