शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

योजनेच्या लाभाअभावी खचतेय बलात्कार पीडितांचे ‘मनोधैर्य’

By admin | Updated: April 9, 2016 02:01 IST

बलात्कारपीडित महिला, बाल लैंगिक अत्याचार व अ‍ॅसीड हल्लापीडित महिला व तरूणींना बसलेल्या जबर धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी ...

मंजूर २० पीडितांना लाभच नाही३५ पीडितांना मदतीची प्रतीक्षामहिला व बालकल्याण विभागाकडून ४० लाखांचा निधीनरेश रहिले गोंदियाबलात्कारपीडित महिला, बाल लैंगिक अत्याचार व अ‍ॅसीड हल्लापीडित महिला व तरूणींना बसलेल्या जबर धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे ‘मनोधैर्य योजना’ राबविली जात आहे. मात्र या योजनेची माहिती अनेकांना नाही. ज्यांना या योजनेची माहिती आहे त्यांनी अर्ज केले. परंतु अर्ज करणाऱ्यांपैकी १९ पीडीतांना या योजनेचा लाभच देण्यात आलेला नाही. २ आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१६ अखेरपर्यंत जिल्ह्याच्या १६ पैकी ५ पोलीस ठाण्यातील पाच बलात्कार पीडीतांचे या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज आले आहेत. यातील चार प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. या चारपैकी ३ पीडीतांना मदत देण्यात आली. त्याचबरोबर बाल लैंगिक अत्याचाराची ६० प्रकरणे महिला बाल विकास विभागाकडे आली. त्यातील ४४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. मात्र २५ पीडीतांनाच मदत देण्यात आली. मंजूर असलेल्या प्रस्तावांपैकी बलात्काराच्या एक व बाल लैंगिक अत्याचाराच्या १९ अशा २० प्रकरणातील पीडीतांना लाभ देण्यात आला नाही. ही योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत महिलांचे पाच प्रकरण तर बाल लैंगिक अत्याचाराचे ६० प्रकरण समोर आले, परंतु ३५ प्रकरणांतील पीडीतांना मदत मिळाली नाही. बलात्कारपीडित महिला, बाल लैंगिक अत्याचारग्रस्त महिलांना बसलेल्या जबर धक्क्यातून सावरण्यासाठी ही योजना शासनाने २ आॅक्टोबर २०१३ ला सुरू करण्यात आली आहे. बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात मनोधैर्य योजनेंतर्गत पीडीतांना दोन ते तीन लाख रूपये देण्यात येतात. अ‍ॅसीड हल्ल्यात चेहरा कुरूप झाल्यावर तीन लाख आणि जखमी झाल्यास ५० हजार रूपये देण्यात येतात. पीडीतांच्या मदतीसाठी असलेल्या या योजनेच्या समितीवर जिल्हाधिकारी अध्यक्ष तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सदस्य म्हणून पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सरकारी वकील, महिला व तांत्रिक क्षेत्रात काम करणारे विशेषतज्ज्ञ अशा सहा लोकांचा समावेश आहे. एफआयआर झाल्यानंतर पोलीस एक तासानंतर जिल्हाधिकाऱ्यांना एसएमएस किंवा ईमेल द्वारे माहिती देतात. समिती सात दिवसात बैठक घेऊन १५ दिवसात पिडीतेला मदत दिली जाते. बलात्कार प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यावर ५० टक्के रक्कम व आरोपपत्र दाखल झाल्यावर ५० टक्के निधी देण्यात येतो. पीडीतेला त्या धक्क्यातून सावरण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात येते. पीडीतेच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना मानसिक आधार देण्याचे काम करीत समुपदेशन करण्यात येते.