गोंदिया : प्रेयसीला लग्नाच्या भूलथापा देत तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रियकराला सालेकसा पोलिसांनी वर्षभरानंतर अटक केली आहे. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. सालेकसा तालुक्याच्या हलबीटोला (कोटरा) येथील आरोपी मनोज प्रेमलाल मारगाये (२४) याने गावातीलच एका तरूणीचे अल्पवयीन असल्यापासूनच तिचे लैंगिक शोषण केले. मात्र ती वयात येताच तिने लग्नास म्हटल्यावर त्याने लग्नास नकार दिला. त्याच्यावर भादंविच्या कलम ३७६ (२), सहकलम बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला. ही तक्रार ६ आॅक्टोबर २०१३ ला करण्यात आली. तेव्हापासून मनोज फरार होता. तो मुंबईच्या ठाणे येथे गेला होता. पैसे कमवून गावाला परत आला. तो लग्न करण्याच्या तयारीत असताना सालेकसा पोलिसांनी त्याला अटक केली.अपघाताचा इसमाचा मृत्यू
बलात्काराच्या आरोपीला वर्षभरानंतर अटक
By admin | Updated: November 8, 2014 01:22 IST