शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात इच्छुकांसाठी रान मोकळे

By admin | Updated: October 7, 2016 01:47 IST

नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण ‘सर्वसाधारण’, अर्थात खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक

नगर परिषद अध्यक्षपद : खुल्या प्रवर्गामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवितगोंदिया : नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण ‘सर्वसाधारण’, अर्थात खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छूक असणाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून ‘देवी पावली’ असा भास त्यांना होत आहे. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवाराला निवडणूक लढविता येणार असल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. यामुळे राजकीय पक्षांपुढील पेचही वाढण्याची शक्यता आहे. अनेक वेळा विशिष्ट प्रवर्गासाठी पद आरक्षित झाल्यानंतर तीव्र इच्छा असूनही अनेकांना निवडणूक लढता येत नाही. पण नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाल्यामुळे ही संधी आपल्यालाच मिळावी यासाठी अनेक जण सक्रिय झाले आहेत. राजकीय पक्ष व इच्छुकांकडून नवनवीन समीकरणे तयार करण्यास सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर थेट नागरिकांमधून नगराध्यक्ष निवडल्या जाणार आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीच्या काळात नाही तर इतर वेळेसही जास्तीत जास्त चांगला जनसंपर्क ठेवणाऱ्या उमेदवाराला फायदा होणार आहे. यातच इच्छुकांची वाढती संख्या पाहता सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे पुन्हा एकदा आपली ताकद आजमावतात की एकामेकांशी हातमिळवणी करून निवडणुकीला सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.बुधवारी (दि.५) नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच शहराच्या कानाकोपऱ्यात फक्त हाच विषय सर्वांच्या तोंडावर दिसून येत होता. एका प्रभागात दोन सदस्य अशी यंदाची प्रभाग रचना राहणार असून यासोबतच आता नगराध्यक्षाची निवड जनतेतून करण्याचा नवा प्रयोग शासनाकडून केला जात आहे. शहरातील प्रभागांचे आरक्षण जाहीर होऊन बराच वेळ झाला व आपापल्या प्रभागाला घेऊन आजी-माजी, विद्यमान व इच्छूकांकडून तयारीही केली जात आहे. मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होण्यास उशिर झाल्याने त्याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता होती. कधी आरक्षण निघते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यातच सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद निघाल्याचे कळताच खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसह सर्वांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.विशेष म्हणजे सध्या नवरात्रीची धामधूम सुरू असून कुणीही अन्य विषयांवर बोलताना दिसत नव्हते. आता सामना रंगणार हेच वाक्य सर्वांच्या तोंडातून निघाले. काही माजी तर काही विद्यमान सदस्यांच्या आशा यामुळे पल्लवीत झाल्या आहेत. याशिवाय आता सर्वांनाच रान मोकळे असल्याने यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. आता राष्ट्रीय पक्षांकडून कुणाला तिकीट मिळते, कुणाला अपक्ष मैदानात उतरावे लागते यावरही बरेच गणित अवलंबून राहणार आहे. (शहर प्रतिनिधी) समर्थकांनी फोडले फटाके गोंदियाचे नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरात काही इच्छुकांच्या समर्थकांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. आता सर्वांसाठी ही निवडणूक मोकळी झाली त्यामुळे कुणीही रिंगणात उतरू शकणार असल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व्यक्त केला. यंदा नगराध्यक्ष जनतेला निवडून द्यायचा असल्याने त्यासाठी स्वच्छ प्रतिमा, सर्वांसाठी धावून जाणारा, जनतेत दांडगा जनसंपर्क अशा बाबी महत्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षेत खरा उतरणारा कोण ठरतो, आता हे येणारा काळच दाखविणार आहे.सन २००२ नंतर दुसऱ्यांदा प्रयोग नगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा हा प्रयोग यापूर्वी सन २००२ मध्ये करण्यात आला. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे के.बी.चव्हाण हे जनतेतून निवडून आले होते. शहरवासीयांच्या काय तर जिल्हावासीयांच्या सदैव स्मरणात राहणार अशी ही निवडणूक झाली होती. कारण या निवडणुकीत ‘कन्हैया मौसी’ नामक तृतीयपंथी रिंगणात उभी होती. सन २००२ ते २००७ अशा चव्हाण यांचा कार्यकाळ होता. त्यानंतर आता पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा प्रयोग केला जात आहे.