शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराची शिकार करणारे गजाआड

By admin | Updated: March 16, 2017 00:18 IST

वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय गोठणगावअंतर्गत येणाऱ्या परसटोला येथील गट क्र.३५५ चनाबोडी येथे अवैधपणे रानडुकराची शिकार करुन ....

दोन आरोपींना अटक : २७ पर्यंत न्यायालयीन कोठडी बोंडगावदेवी : वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय गोठणगावअंतर्गत येणाऱ्या परसटोला येथील गट क्र.३५५ चनाबोडी येथे अवैधपणे रानडुकराची शिकार करुन मांस विक्री करीत असताना आढळून आलेल्या २ आरोपींना गजाआड करण्यात वनविभागाचे अधिकारी छत्रपाल रहांगडाले यांच्या पथकास यश आले. पतीराम कुसन कोरेटी (५५) व सत्यवान रामचंद्र तोरे (३१) रा. परसटोला अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय गोठणगाव यांच्याकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, १२ मार्चच्या पहाटे ४ च्या सुमारास सुगावा लागताच परसटोला येथील मुलचंद पेंदाम यांच्या राहत्या घरी वनविभागाच्या पथकाने छापा मारला. त्यात गावातील पतीराम कोरेटी, सत्यवान तोरे यांनी जंगलातील ३ रानटी डुकरांची शिकार करुन मांसाची विल्हेवाट लावत असताना रंगेहात पकडण्यात आले. घटनास्थळावर रानडुकराचे ३ मुंडके, १० खुरा अंदाजे ३ किलो मांस भाजत असताना आढळून आले. सदर आरोपींना त्याच क्षणी ताब्यात घेवून शिकारी करिता वापरलेले साहित्य व मास हस्तगत करण्यातआले. अवैधपणे रानडुकराची शिकार केल्याच्या आरोपावरुन वन गुन्हा क्रमांक १६०/२०१७ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चेकलम २,९,३१, ३९,५०, ५१ अन्वये गुन्हा नोंदवून पतीराम कोरेटी, सत्यवान तोरे या दोन आरोपींना गजाआड करण्यात आले. अर्जुनी मोरगाव येथील न्यायालयात सादर करुन २७ मार्च पर्यंत त्या दोन आरोपींची न्यायालयीन कोठडी मिळविण्यात आली. उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जी. उदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)