शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रणधुमाळीला आला वेग

By admin | Updated: June 26, 2015 01:36 IST

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीने आता चांगलाच वेग घेतला आहे.

गोंदिया : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीने आता चांगलाच वेग घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रसचे विधिमंडळातील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल हे दिग्गज नेते दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा घेणार आहेत.जिल्ह्यात खरी लढत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख तीन पक्षातच आहे. त्यामुळे तीनही पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कमी असल्यामुळे मतदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी नेते आपलीही आपली ताकद पणाला लावणार आहेत.दरम्यान नामांकन रद्द झाल्यामुळे अपिलात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समित्यांच्या सहा मतदार संघातील उमेदवारांसाठी उमेदवारी मागे घेण्याची मुदत बुधवारी ठेवली होती. त्यात जिल्हा परिषदेच्या २५ तर पंचायत समित्यांच्या ८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या आता २३७ तर पंचायत समित्यांच्या १०६ मतदार संघांमधील उमेदवारांची संख्या ४२३ झाली आहे.मुख्यमंत्र्यांची सभा नागऱ्यातभारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाजता जाहीर सभा शुक्रवारी २६ जून रोजी दुपारी १ नागरा येथील मोहरानटोलीच्या मैदानावर होणार आहे. या सभेला पालकमंत्री राजकुमार बडोले, प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, खा.नाना पटोले, खा.अशोक नेते, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ.संजय पुराम, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्यासह भाजपाचे अनेक माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित राहतील.राधाकृष्ण विखे पाटीलमहाराष्ट्र विधीमंडळाचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी दि.२६ व २७ रोजी विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. शुक्रवारी दुपारी २ वाजता त्यांचे बिरसी विमानतळावर आगमन होईल. २.३० वाजता गोरेगाव, ४ वाजता चिखली (ता.सडक-अर्जुनी), ६ वाजता नवेगावबांध आणि रात्री ८ वाजता अर्जुनी मोरगाव तालुक्यात सभेला मार्गदर्शन करतील. दि.२७ ला दुपारी ३ वाजता कामठा, ४ वाजता नवेगाव (धापेवाडा), ५ वाजता अर्जुनी (ता.तिरोडा), ६.३० ला सेजगाव, रात्री ८.३० ला पांढराबोडी आणि ९ वाजता नागरा येथील सभेला मार्गदर्शन करतील. यावेळी त्यांच्यासोबत राज्य विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ.गोपालदास अग्रवाल, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि गोंदिया जिल्हा प्रभारी कृष्णकुमार पांडे, माजी आ.रामरतन राऊत व इतर पदाधिकारी राहतील.अशोक चव्हाणकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण शुक्रवारी (दि.२६) एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूरमार्गे चव्हाण दुपारी १२.३० वाजता सौंदड, दुपारी २.३० वाजता देवरी, ४.३० वाजता साकरीटोला, सायंकाळी ६ वाजता रिसामा आणि रात्री ८ वाजता खमारी येथील सभांना चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल, अ.भा. काँग्रेस कमिटीचे सचिव तथा प्रदेश सहप्रभारी आ.बाला बच्चन, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, कृष्णकुमार पांडे आदी राहणार आहेत.प्रफुल्ल पटेलराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल शनिवारी (दि.२७) आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गोरेगाव, गोंदिया आणि आमगाव तालुक्यात सभा घेणार आहेत. शनिवारी सकाळी १०.३० वाजता सोनी, ११.१५ वाजता कुऱ्हाडी, १२ वाजता फुलचूरटोला, दुपारी १२.४५ वाजता खमारी, १.३० वाजता आसोली, २.१५ वाजता नागरा, ३ वाजता दासगाव (बु), ४ वाजता काटी, ४.३० वाजता धामणगाव, ५ वाजता अर्जुनी, ५.४५ वाजता सिरपूर येथे प्रचारसभेला मार्गदर्शन करतली. ६.३० पासून रात्री १० पर्यंत आमगाव तालुक्यात अनेक ठिकाणी सभा घेतील. (जिल्हा प्रतिनिधी)