शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

हक्काच्या पगारासाठी रामटेके बसले उपोषणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

साखरीटोला : कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा एकीकडे सन्मान केला जात असताना दुसरीकडे सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधीक्षक ...

साखरीटोला : कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा एकीकडे सन्मान केला जात असताना दुसरीकडे सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एस. रामटेके यांना हक्काच्या पगारासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे.

प्रकरण असे की, डॉ. रामटेके ३ मार्च रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे किरकोळ रजेचा अर्ज देऊन आपल्या मुलाच्या औषधोपचारासाठी मुलाला घेऊन नागपूर गेले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र क्रमांक नै.आव्य/कोरोना/कावि-२०८-२०२१ दिनांक ८ मार्च रोजी काढून फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचा पगार थांबविण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळात घरचा आणि मुलाच्या औषधोपचारांचा खर्च कसा भागवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. रामटेके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारवार विनंती केल्यावर सुद्धा पगार मिळाला नसल्यामुळे त्यांनी सोमवारी (दि.१२) जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, कोषागार अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देऊन थकित पगार मिळाला नाही तर मंगळवारपासून (दि.१३) पासून आमरण उपोषणावर बसणार असल्याची माहिती दिली होती.

मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नसल्यामुळे मंगळवारपासून (दि.१३) डॉ. रामटेके उपोषणावर बसले आहे. उल्लेखनीय असे की, सध्याच्या परिस्थितीत सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात फक्त एकच म्हणजे डॉ. रामटेके हेच कार्यरत आहेत. आता ते सुद्धा उपोषणावर बसले असल्याने ग्रामीण रुग्णालय डॉक्टर विहीन झाले आहे. कोरोना संसर्ग काळात रात्रंदिवस सेवा देणाऱ्या डॉक्टरांना वेळेवर पगार मिळत नसेल तर त्यांनी उपाशी राहून रुग्णांची सेवा करावी का? असा प्रश्न गावकरी करीत आहेत.

जिल्ह्यात व तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात डॉक्टराची मन:स्थिती चांगली असणे गरजेचे आहे. पगारापासून वंचित असलेल्या डॉ. रामटेके यांचा त्वरित पगार काढण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.