शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या पगारासाठी रामटेके बसले उपोषणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST

प्रकरण असे की, डॉ. रामटेके ३ मार्च रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे किरकोळ रजेचा अर्ज देऊन आपल्या मुलाच्या औषधोपचारासाठी मुलाला घेऊन नागपूर गेले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र क्रमांक नै.आव्य/कोरोना/कावि-२०८-२०२१ दिनांक ८ मार्च रोजी काढून फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचा पगार थांबविण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळात घरचा आणि मुलाच्या औषधोपचारांचा खर्च कसा भागवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे२ महिन्यांचा पगार अडला : त्वरित पगार काढण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कसालेकसा :  कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा एकीकडे सन्मान केला जात असताना दुसरीकडे सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एस. रामटेके यांना हक्काच्या पगारासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे.प्रकरण असे की, डॉ. रामटेके ३ मार्च रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे किरकोळ रजेचा अर्ज देऊन आपल्या मुलाच्या औषधोपचारासाठी मुलाला घेऊन नागपूर गेले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र क्रमांक नै.आव्य/कोरोना/कावि-२०८-२०२१ दिनांक ८ मार्च रोजी काढून फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचा पगार थांबविण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोना काळात घरचा आणि मुलाच्या औषधोपचारांचा खर्च कसा भागवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. रामटेके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारवार विनंती केल्यावर सुद्धा पगार मिळाला नसल्यामुळे त्यांनी सोमवारी (दि.१२) जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, कोषागार अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देऊन थकित पगार मिळाला नाही तर मंगळवारपासून (दि.१३) पासून आमरण उपोषणावर बसणार असल्याची माहिती दिली होती.मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नसल्यामुळे मंगळवारपासून (दि.१३) डॉ. रामटेके उपोषणावर बसले आहे. उल्लेखनीय असे की, सध्याच्या परिस्थितीत सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात फक्त एकच म्हणजे डॉ. रामटेके हेच कार्यरत आहेत. आता ते सुद्धा उपोषणावर बसले असल्याने ग्रामीण रुग्णालय डॉक्टर विहीन झाले आहे. कोरोना संसर्ग काळात रात्रंदिवस सेवा देणाऱ्या डॉक्टरांना वेळेवर पगार मिळत नसेल तर त्यांनी उपाशी राहून रुग्णांची सेवा करावी का? असा प्रश्न गावकरी करीत आहेत.जिल्ह्यात व तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या सहा दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात  डॉक्टराची मन:स्थिती चांगली असणे गरजेचे आहे.  पगारापासून वंचित असलेल्या डॉ. रामटेके यांचा त्वरित पगार काढण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

आमदारांच्या मध्यस्थीनंतर उपोषणाची सांगता डॉ. रामटेके ग्रामीण रुग्णालयासमोर उपोषणावर बसले आहेत. याबाबत माहिती मिळताच आमदार सहसराम कोरोटे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासोबत चर्चा करून त्यांचे या प्रकरणाचे निराकरण केले. तसेच डॉ. रामटेके यांना लिंबू पाणी पाजून आमरण उपोषणाची सांगता केली. याप्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष वासुदेव चूटे, ठाणेदार प्रमोद बघेले, नायब तहसीलदार व ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :doctorडॉक्टर