शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तिबेटीयनांची दुर्गा चौकातून निघाली रॅली

By admin | Updated: March 13, 2017 00:27 IST

तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा तसेच तिबेटमधील सर्व धर्मगुरुंना दीर्घायुष्य लाभो तसेच तिबेट लवकर स्वतंत्र होऊन

शांतीमय वातावरणात दीपमार्च : तिबेटी क्रांतिदिनी तहसीलदारांना निवेदन अर्जुनी-मोरगाव : तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा तसेच तिबेटमधील सर्व धर्मगुरुंना दीर्घायुष्य लाभो तसेच तिबेट लवकर स्वतंत्र होऊन तेथील रहिवासी व निर्वासित तिबेटीयनांचे मिलन व्हावे, या अपेक्षेने शुक्रवारी सायंकाळी ५८ व्या तिबेटी क्रांती दिवसप्रसंगी रिजनल तिबेटीयन युथ काँग्रेस व नोरग्यालिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगडच्या वतीने शांततापूर्ण वातावरणात दीपमार्च काढण्यात आला. शांतात रॅली स्थानिक दुर्गा चौकातून निघाली. प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभेत रुपांतर झाले. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या मार्चचे नेतृत्व युथ काँग्रेसचे अध्यक्ष लोपसंग त्सेरिंग, सचिव कर्मा थामजोय, पेन लोपसंग तेन्पा, तेनजीन पासंग, लाम्हो त्सेरींग, गुरमेटी दंचेन, तेनजीन संग्याल यांनी केले. १० मार्च १९५९ रोजी तिबेटच्या तिन्ही प्रांतातील लाखो तिबेटीयनांनी राजधानी ल्हासा येथे एकत्रीत येऊन जनआंदोलनाच्या रुपात लामाचे दीर्घायुष्य, तिबेटचे स्वातंत्र्य व चीनची हकालपट्टी यावर घोषणा करून चिनचा विरोध केला. या ऐतिहासीक दिनी सर्वच निर्वासित वसाहतीत दीपमार्च काढला जातो. आपल्या स्वार्थासाठी तिबेटला पर्यटन केंद्राच्या रुपात चीनद्वारे विकसीत करण्याचा प्रयत्न होत आहे. चीन सरकार तिबेटीयन जाती, भाषा व संस्कृतीला समूळ नष्ट करण्यासाठी क्रूर धोरणांचा अवलंब करीत आहे. तिबेटध्ये श्रध्देय असलेले लामा यांच्याप्रती सन्मान व्यक्त करणाऱ्या श्रध्दाळूंना मौलीक अधिकारांचे हननच नव्हे तर बळजबरीने पकडून अटक करण्याची दहशत आहे. तिबेटमध्ये संस्कृतीनुरुप अवतार ओळखण्याची व्यवस्था आहे. चौदावे दलाई लामा यांच्या पुनर्जन्म निवडीचे अधिकार चीन आपले अधिकार असल्याचे मानत आहे, याचा विरोध केला जात आहे. शांततापूर्ण आंदोलनकाऱ्यांना चीन क्रूर व दहशतयुक्त धोरणाने आत्मदहन करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे. या सर्व घटनांचा विरोध तिबेटीयनांनी दर्शविला. जोपर्यंत तिबेटवर चीनचे अधिपत्य राहील तोवर हा संघर्ष सुरूच असेल, असे तिबेटी युवक काँग्रेसने आवाहन केले. (तालुका प्रतिनिधी)