शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘सरकार जागे व्हा’च्या घोषणांनी निघाला मोर्चा

By admin | Updated: March 2, 2016 02:17 IST

संघर्ष वाहिनी व भटके विमुक्त संघर्ष परिषद नागपूर या सामाजिक संघटनेच्या आवाहनानुसार ‘सरकार जागे व्हा व न्याय द्या’ अशा घोषणा ...

न्यायाची मागणी : संघर्ष वाहिनी व भटके विमुक्त संघर्ष परिषदेचे आंदोलनगोंदिया : संघर्ष वाहिनी व भटके विमुक्त संघर्ष परिषद नागपूर या सामाजिक संघटनेच्या आवाहनानुसार ‘सरकार जागे व्हा व न्याय द्या’ अशा घोषणा करीत सोमवार (दि.२९) दुपारी १२.३० वाजता विमुक्त भटक्या जमातीचा धडक मोर्चा निघाला. सदर मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघर्ष वाहिणीचे राजेंद्र बढिये, माणिक गेडाम, अनिल मेश्राम, परेश दुरूगवार, दिलीप कोसरे आदींनी माल्यार्पण केले. यानंतर असंख्य महिला व पुरूषांचा हा मोर्चा जयस्तंभ मार्गे नेहरु चौकात आला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. येथे संघटक राजेंद्र बढिये, परेश दुरूगवार, अनिल मेश्राम व गजेंद्र वारनकर यांनी मोर्च्याला मार्गदर्शन केले. संचालन दिलीप कोसरे यांनी केले. येथील सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावे मुख्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आले. या वेळी संघर्ष वाहिणीचे राजेंद्र बढिये, परेश दुरुगवार, जयचंद नगरे, अनिल मेश्राम, दिलीप कोसरे, जानराव घटारे, मोहनलाल कागदीउके, मनिराम मौजे, रवी भोरे, शिशुकला हातांगळे आणि माणिक गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. निवेदनानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विमुक्त भटक्यांना ११ टक्के आरक्षण, क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करणे, राज्याच्या अर्थसंकल्पात विमुक्त भटक्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विशेष आर्थिक तरतूद करणे, व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर वसतीगृह तयार करणे, बेघरांसाठी घरकूल योजना, बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन अल्पदराने कर्ज योजना लागू करणे, जननी सुरक्षा योजनेंतर्गत विमुक्त भटक्या जमातीच्या गरोदर महिलांनासुध्दा प्रसूती पश्चात निधी मिळावा, मच्छिमारांना किमान २०० दिवस हाताला काम व विकास योजना लागू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. सदर मागण्या त्वरित पूर्ण करण्याच्या उद्देशाने शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले.सदर मोर्चासाठी पुरूषांसह महिला शशीकला हातांगळे, रागिणी मेश्राम, मीना कोसरे, रंजना सुरजकर, आशा सोनवाने, मंदा सुरणकर, सुजाता कोसरे, प्रियंका कोसरे, शीला साऊसकार, प्रियंका कोसरे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)