शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

धानाला हजार रूपयांची भाववाढ द्या

By admin | Updated: May 16, 2015 01:22 IST

धानाला प्रती क्विंटल एक हजार रूपये भाववाढ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

साखरीटोला : धानाला प्रती क्विंटल एक हजार रूपये भाववाढ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ओबीसी आघाडी व किसान आघाडी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असा इशारा दिला आहे.मागण्यांमध्ये सरकारी धान खरेदी केंद्र तत्काळ सुरु करावे, विक्री केलेल्या धानाचा मोबदला आठ दिवसांत देण्यात यावा, धानाची आधारभूत किंमत प्रती क्विंटल एक हजार रुपयांनी वाढविण्यात यावी, धानावर प्रती हेक्टर बिन व्याजी ५० हजार रुपये कृषी कर्ज देण्यात यावे, शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ३० हजार रुपये मदत देण्यात यावी, केंद्र सरकार जुलमी कायदा भू- संपादन बील रद्द करण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांची नान क्रिमिलेयर मर्यादा ९ लाख करुन ओबीसी वरील अन्यायकारक महाराष्ट्र सरकारचा आदेश रद्द करण्यात यावा या मागण्यांचा समावेश आहे. सध्या रबी धान पिकाची कापणी व मळणी जोमात सुरु आहे. धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करावे व जिल्ह्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, तालुकाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, तुकाराम बोहरे, रामेश्वर पंधरे, ओमप्रकाश पारधी, बिसरात चर्जे, अभिषेक चुटे, कैलाश धामडे, महेंद्र कुराटे, मनीष पुराम, पप्पू राणे, निर्दोष साखरे, मनोज शरणागत, दौलत अग्रवाल यांचा समावेश आहे. (वार्ताहर)