शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या परतीने जिल्हा सुखावला

By admin | Updated: July 12, 2017 02:26 IST

मध्यंतरी दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा आपली हजेरी लावली असून मागील तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने जिल्हा सुखावला आहे.

तीन दिवसांपासून हजेरी : शेतीच्या कामांना जोमात सुरूवात लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मध्यंतरी दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा आपली हजेरी लावली असून मागील तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने जिल्हा सुखावला आहे. या पावसामुळे अडून पडलेली शेतीची कामे पुन्हा जोमात सुरू झाली आहेत. आतापर्यंत १६९.२ एवढी पावसाची सरासरी नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने यंदा सुरूवातीपासूनच चांगला पाऊस पडणार असा अंदाज वर्तवून सर्वांना खूश केले होते. मात्र खात्याचा अंदाज आतापर्यंंत तरी चूक ठरला. जुलै महिना अर्ध्यात आला असून आतापर्यंत पावसाळा खऱ्या अर्थाने सुरूच झाला नसल्याचे दिसून येत आहे. एक-दोन दिवस बरसल्यानंतर पाऊस निघून जात असल्याचेच आता पर्यंत दिसले व अशातच जुलै महिना अर्ध्यात आला. पाऊस नसल्याने शेतीची कामेही बंद पडलेली होती. मागील तीन दिवसांपासून दररोज पाऊस हजेरी लावत असल्याने आता कोठे पावसाळा सुर झाल्या सारखे वाटत आहे. तर या पावसामुळे शेतकरीही खूश झाला असून शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. पाऊस नसल्यामुळे रोवणीची कामे अडकून पडली होती. तर ज्यांनी नर्सरी टाकली होती त्यांची नर्सरी करपण्याचा मार्गावर आली होती. मात्र या पावसामुळे आता तो धोका टळला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५५८१.८ मीमी. पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याची १६९.२ एवढी सरासरी आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी १ जून ते ११ जुलै या काळात ११५०४.२ मीमी. पावसाची नोंद घेण्यात आली होती व त्याची सरासरी ३४८.६ एवढी होती. यंदा मात्र मगील वर्षीच्या तुलनेत या वर्षी अर्धाच पाऊस पडला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.